मास्क न घालणाऱ्या 1240 जणांवर आतापर्यंत कारवाई


मास्क न घालणाऱ्या 1240 जणांवर आतापर्यंत कारवाई
SHARES
मुंबईत सध्या कोरोनाची दहशत असतानाच, खबरदारी म्हणून तोडांला मास्क लावा असे सांगून देखील काही बेशिस्त नागरिक मास्क न वापरता फिरत आहेत. अशा मास्क न वापरणाऱ्यां 813 जणांवर पोलिसांनी आतापर्यंत कारवाईचा बडगा उगारला आहे. त्या शिवाय 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी जमणे, कलन 188 चे उल्लघंन केल्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 12 हजार 059 जणांवर गुन्हे नोंदवलेले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लाँकडाऊन पुकारण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी गरजे व्यतिरिक्त बाहेर पडू नये, पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकञ जमू नये, तसेच तोंडाला मास्क वापरणे सक्तीचे केले असताना. काही बेशिस्त नागरिक आज ही या नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांमुळेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अडचणी येत असल्याचे अनेक उदाहरणातून दिसून आले आहे. मुंबईत सध्या कोरोना या संसर्ग रोगामुळे आतापर्यंत    जणांचा बळी गेला आहे. असे असताना ही, बेजबाबदार नागरिकांकडून काही नियमांचे पालन होत नसल्यामुळे पोलिसांनी अशांवर कारवाई करण्यास सुरूवात केली.

पोलिसांनी या पूर्वीच नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर आतापर्यंत 12 हजार 059 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत 7 हजार 078 जणांना अटक करून त्याची जामीनावर मुक्तता केली आहे. तर  1668  जणांचा पोलिस शोध घेत आहेत.  3213जणांना पोलिसांनी आतापर्यंत नोटीस दिल्या आहे. माञ या सर्वांमध्ये सर्वात बेजबाबदार म्हणून मास्क न लावणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

पोलिसांनी मास्क न लावणाऱ्यांविरोधात 18 एप्रिल पासून कारवाई सुरू केली. आतापर्यंत पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या 1240  जणांवर गुन्हा नोंदवला आहेत.  पश्चिम आणि मध्य मुंबईत मास्क न लावणाऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी दिवसभरात पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या 18 जणांवर कारवाई केली आहे. सरकारकडून वेळोवेळी सांगून समाजसेवी संस्थांनी मास्कचे वाटप करून सुद्धा ही महामारी पसरवण्यास मदत करणाऱ्या अशा बेजबाबदारांना पोलिस चांगलाच खाकीचा धाक दाखवताना दिसत आहेत.


या पूर्वीच Covid -19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं आज मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्ण बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही मास्कचा वापर अनिवार्य आहे. 5 पेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर सरकारनं यापूर्वीच बंदी घातली आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा