संतापजनक...! धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शिपायाला सोसायटीने प्रवेश नाकारला ?


संतापजनक...! धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या शिपायाला सोसायटीने प्रवेश नाकारला ?
SHARES

एकीकडे डॉक्टर, रुग्णालयांमध्ये काम करणारे वैद्यकीय कर्मचारी  आणि पोलिस सर्वसामान्यांसाठी जीवाचे रान करून अहोरात्र काम करत असताना काही ठिकाणी त्यांना त्रासही दिला जात आहे. अशाच एका मनोबल खच्चीकरण करणाऱ्या प्रसंगाला धारावीतील एका पोलिसाला सामोरे जावे लागले. या पोलिसाला 'कोरोना बाधित' असल्याचे हिणवत सोसायटीतील रहिवाशांंनी शुक्रवारी प्रवेश नाकारला. ऐवढ्यावरच न थांबता सोसायटीमधील काही माथेफिरूंनी 'त्या' पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत त्याची गाडी ही फोडली.  स्थानिक खडकपाडा पोलिसांनी ही या घटनेची दखल न घेतल्यामुळे हे कुटुंब भितीच्या सावटाखाली रहात आहेत.


कल्याणच्या मेहर नगर को.आँ. सोसायटीत  रोहित (नाव बदलले आहे ) हे त्यांची पत्नी आणि मुलासोबत 2010 पासून  राहतात. ते सध्या धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.धारावीत कोरोनाचा संसर्ग जसा वाढू लागला तसतशी सोसायटीमध्ये रोहित यांच्या कुटुंबियांविषयी चर्चा सुरू झाली. रोहित यांनी पहिल्यांदा फार लक्ष दिले नाही.  कालांतराने या चर्चेला वेग आला, रोहित आणि त्यांचे कुटुंबिय समोर आल्यास सोसायटीतील नागरिक रस्ता बदलू लागले.  नागरिकांची तोंड गप्प करता येणार नाही म्हणून रोहित यांच्या कुटुंबियांनी घराबाहेर पडणे बंद केले. स्वत: रोहित ही राञी उशिरा घरी परतू लागले.त्यानंतर मात्र सोसायटीतून होणारा त्रास वाढला. त्यांनी सोसायटीत राहू नये यासाठी रोहित यांच्यी गाडीची त्यांच्या पश्च्यात मोडतोड केली.


प्रकरण हाताबाहेर गेल्याने रोहित यांनी सोसायटीच्या अध्यक्षांकडे विचारणा केली असता. त्याने 'कोरोना बाधिताची गाडी असल्याने मोडतोड केली' हे उत्तर दिले. तसेच रोहित यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की ही करण्यात आली. कालांतराने कल्याणच्या खडकपाडा  पोलिसांच्या  हस्तक्षेपाने रोहित यांना सोसायटीने  प्रवेश दिल्यानंतर सुमारे दीड तास चाललेल्या या नाट्यावर पडदा पडला.  वस्तूस्थिती अशी की, रोहित किंवा त्यांची पत्नी आणि मुलाला कोरोनाचे कुठले ही लक्षण नाही, तरही त्यांना या नाहक ञासाला सामोरे जावे लागत असल्याचे 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.

 हे  बिनबुडाचे आरोप असून 'त्या' पोलिस शिपायाने पूर्ववैमन्यस्याच्या वादातून हे आरोप केले आहे. त्यांना तक्रार नोंदवण्याबाबत विचारणा केली होती. माञ त्यांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला. खडकपाडा पोलिसांनी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना समज देऊन त्या पोलिसाला प्रवेश दिला आहे.

अशोक पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक खडकपाडा पोलिस ठाणे 


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा