वेदनादायक! मुंबईत आणखी दोन पोलिसांचा कोरोनाने घेतला बळी


वेदनादायक! मुंबईत  आणखी दोन पोलिसांचा कोरोनाने घेतला बळी
SHARES
मुंबईच्या शाहू नगर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा कोरोना या संसर्गाने मृत्यू होऊन चार दिवस उलटत नाही तोच, बुधवारी मुंबई पोलिस दलातील दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आतापर्यंत या महामारीने पोलिस दलातील 14 पोलिस कर्मचाऱ्यांचा बळी घेतला असून राज्यात 1388 पोलिस कोरोनाने बाधित आहेत.

मुंबईच्या सहार पोलिस ठाण्यात  कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस फौजदार यांना काही दिवसांरयपूर्वी कोरोनाची लक्षण दिसून आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. माञ बुधवारी अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर दुसरीकडे पार्कसाईट पोलिस ठाण्यातील 57 वर्षीय ज्येष्ठ पोलिस अधिकारी असलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांच्यावर सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू होते. माञ उपचारा दरम्यान त्यांचा ही बुधवारी मृत्यू झाला आहे. राज्यातील 1388 कोरोना बाधित पोलिसांपैकी 618 पोलिस कर्मचारी हे फक्त मुंबईचे आहेत. आतापर्यंत कोरोना साथीच्या रोगाने पोलिस दलातील 11 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याने अस्वस्थतेचे वातावरण आहे. तरी ही 24 तास नागरिकांच्या सेवेसाठी ते तैनात आहेत. माञ मुंबई पोलिस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत दिवसेंदिवस वाढत आहे. माञ पोलिसांमध्ये कोरोनाचा हा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त बेजबाबदार नागरिकांमुळे वाढत आहे. लॉकडाउनबाबत लोक आज ही गांभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. दिवसेंदिवस पोलिस दलातील कोरोना बाधिकांचा वाढता आकडा लक्षात घेऊनच मुंबईत पोलिसांच्या जोडीला आता CISF आणि CRPF केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या बुधवारी मुंबईक दाखल झाल्या आहेत. या यातील एका तुकडीत 100 जवान असणार आहेत.



पोलिसांना विश्रांतीची गरज - उद्धव ठाकरे
 
केंद्रीय पथकांनी मुंबई-पुणे इथं भेटी दिल्या असून उपयुक्त सूचना केल्या आहेत. इथं डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसांना  मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचं काम आहे, ते आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे आवश्यकता भासेल तसं केंद्र सरकारने त्यांचं मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल. त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढताना त्याचा उपयोग होईल, असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा