कोरोनाच्या माहितीसाठी लिंकवर क्लिक करताय? मग, 'हा' व्हायरस तुमचा बँक बॅलेन्स करेल झिरो

कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती घेण्यासाठी तुम्ही विविध लिंक ओपन करत असाल तर सावधान...

कोरोनाच्या माहितीसाठी लिंकवर क्लिक करताय? मग, 'हा' व्हायरस तुमचा बँक बॅलेन्स करेल झिरो
SHARES

कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती घेण्यासाठी तुम्ही विविध लिंक ओपन करत असाल तर सावधान... कारण तुम्ही ही माहिती घेण्यासाठी लिंक ओपन करताच तुमची वयक्तिक माहीती चोरली जाऊ शकते. त्याचबरोबर तुमची आर्थिक लूटही होऊ शकते.

सध्या जगभर कोरोनाबद्दलची माहिती शोधण्यासाठी कोट्यवधी लोक इंटरनेटवर माहिती घेत आहेत. coronavirusmap.com आणि अशा अनेक Links लोकांच्या whatsappवरही येत आहेत. कोरोना व्हायरस बाबतची माहिती घेण्यासाठीच्या उत्सुकतेनं जर तुम्ही या लिंक ओपन केल्या तर तुम्ही फसवलं जाण्याचा धोका आहे.

अशा अनेक लिंक तुमच्या मोबाईलवर पाठवून सायबर हल्ला करणारे गुन्हेगार तुमची वयक्तिक माहिती घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांनीच हा मालवेयर तयार केला असल्याची माहिती पिंपरी चिंचवडच्या पोलीस सायबर सेलचे प्रमुख सुधाकर काटे यांनी दिली आहे.

असे गुन्हे रोखण्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र पथकही कार्यरत ठेवलं आहे आणि या पथकामार्फत अशा गुन्ह्यांवर नजर ठेवली जात आहे. कोरोना बाबत चुकीची माहिती पसरवणाऱ्यावरही या विभागामार्फत गुन्हे दाखल केले जाणार असल्याचंही काटे यांनी सांगितलं.

कोरोना वायरसची लागण होऊ नये म्हणून जसं तुम्ही मास्क सॅनिटाइझर वापरून स्वतःचा जिव सुरक्षित ठेवत आहात. अगदी त्याच प्रमाणे कोणत्याही उत्सुकतेपोटी तुमच्या मोबाइल वर आलेली कोणतीही अनोळखी लिंक, व्हिडीओ किंवा मेसेज न उघडल्यास तुमची वयक्तिक माहिती आणि ऑनलाइन पद्धतीनं आर्थिक चोरी होण्यापासून तुम्ही वाचू शकाल



हेही वाचा

पीएमसी बॅंक प्रकरणी तिघांना अटक

मुंबईत असे कोणतेही पोलिस ठाणे नाही, ज्यात या दोघांवर गुन्हे दाखल नाहीत

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा