'त्या' पोलिस शिपायाचे आरोप बिनबुडाचे


'त्या' पोलिस शिपायाचे आरोप बिनबुडाचे
SHARES
मुंबईतल्या धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस शिपायाने दोन दिवसांपूर्वी सोसायटीकडून प्रवेश दिला जात नसल्याचा आरोप केला होता. माञ हे आरोप बिनबुडाचे असल्याचे कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी सांगितले आहे. पूर्ववैमन्यसातील वादातून हे आरोप त्या पोलिसांने केल्याचे पवार यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलता सांगितले.


मुंबईच्या धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या त्या पोलिस शिपायाला सोसायटीकडून ञास दिला जात असून प्रवेश ही नाकारल्याचे त्या शिपायाकडून आरोप करण्यात आला होता. त्यावेळी त्याने तो धारावी पोलिस ठाण्यात कार्यरत असल्याने सोसायटीतील नागरिक त्याला चुकीची वागणूक देत आहेत. तसेच त्यांची गाडी ही त्यांच्या पश्च्यात मोडतोड केल्याचा आरोप केला होता. तसेच याबाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडे जाब विचारला असता. त्यांनी 'ती गाडी कोरोना बाधिताची असल्याचे त्याला हिणवण्यात आल्याची माहिती त्या शिपायाने 'मुंबई लाइव्ह'ला दिली. 


याबाबत  कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी या वृत्ताचे खंडण करत, त्या शिपायाचे या पूर्वी ही सोसायटीतील कर्मचाऱ्यांशी भांडण झाले होते. ते पोलिस ठाण्यात आल्यानंतर त्या दोघांनी तक्रार देण्यास नकार दिला. तरी ही सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना समज देऊन, त्या  पोलिस शिपायाला  घरी पाठवले.  माञ या सर्व घटनेचा त्याने चुकीच्या पद्धतीने प्रसार केला असल्याची माहिती खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना सांगितले.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा