नगरसेविकेला पोलीस कॉन्स्टेबलची धक्काबुक्की?

 Malad
नगरसेविकेला पोलीस कॉन्स्टेबलची धक्काबुक्की?

मालाड - भाजपा नगरसेविका जया सतनाम सिंह तिवाना यांना महिला पोलीस कॉन्स्टेबलने धक्काबुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे नुसती धक्काबुक्कीच नाही तर या महिला कॉन्स्टेबलने आपल्या आईला शिव्या दिल्याचा आरोप जया यांचा मुलगा तिजेन्द्र तिवाना यांनी केला आहे. या सर्व प्रकारामुळे भाजपाचे कार्यकर्ते संतापले असून, त्यांनी या महिला कॉन्स्टेबल विरोधात तक्रार दाखल करत नाही तोवर आम्ही बांगुरनगर पोलीस ठाण्यासमोर बसून राहू अशी भूमिका घेतली. या प्रकरणी बांगुरनगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.

Loading Comments