नागपाड्यात दाम्पत्यावर हल्ला, महिला जागीच ठार

  Nagpada
  नागपाड्यात दाम्पत्यावर हल्ला, महिला जागीच ठार
  मुंबई  -  

  नागपाडा - येथे राहणाऱ्या दळवी दाम्पत्यावर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. समीरा जुल्फी दळवी (40) हिचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तर जुल्फी दळवी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अनोळखी इसमावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. हत्येचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

  मूळचे गुहागर येथील रहिवासी असलेले दळवी दाम्पत्य नागपाडा येथील बच्चूभाई कम्पाऊंडमध्ये भाड्याने राहतात. येथेच त्यांची एक पानटपरी आहे. ते नुकतेच नागपाडा येथे राहण्यासाठी आले होते. त्यांना तीन मुले असून ते गुहागरला असतात. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांचा भाऊ गावावरून घरी आला. तेव्हा दरवाजा उघडा होता आणि दळवी दाम्पत्य रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या भावाने आरडाओरडा करत स्थानिकांना बोलावून घेतले. दोघांनाही जे.जे. रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच नागपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये समीरा यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तर जुल्फी दळवी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. हा हल्ला लुटीच्या हेतूने की पूर्ववैमनस्यातून करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.