'एचडीआयएल ग्रुप'च्या मालमत्तेचा लिलाव करण्यास न्यायालयाची परवानगी

रिझर्व्ह बॅंकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांनी पीएमसी बॅंकेकडील 'एचडीआयएल'च्या तारण मालमत्तांचे मूल्यांकन करत, टप्या टप्याने मुल्यांकन केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यास न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.

'एचडीआयएल ग्रुप'च्या मालमत्तेचा लिलाव करण्यास न्यायालयाची परवानगी
SHARES

पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेला (पीएमसी) आर्थिक अडचणीतून बाहेर काढून पुनरुज्जीवित करण्याच्या उद्देशाने 'एचडीआयएल ग्रुप'च्या मालमत्तांच्या आधारे जी वसुली करण्याचे प्रयत्न भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रशासकांकडून सुरू आहेत त्यातील एक प्रयत्न बुधवारी यशस्वी ठरला. 'एचडीआयएल'चे प्रवर्तक असलेल्या वाधवान पितापुत्रच्या मालकीची दोन विमाने व एक यॉट विकण्यास दंडाधिकारी न्यायालयाने या प्रशासकांना परवानगी दिली.

पीएमसी बँक घोटाळा उघडकीस आल्यानंतर खातेदारांनी रस्त्यावर उतरून प्रशासन, पोलिस आणि रिझर्व्ह बँकेकडे दाद मागितली. ऐवढ्यावरच न थांबता खातेदारांनी न्यायालयात या प्रकरणी आवाज उठवला. खातेदारांच्या या प्रयत्नांना आता यश प्राप्त झाले आहे. रिझर्व्ह बॅंकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञांनी पीएमसी बॅंकेकडील 'एचडीआयएल'च्या तारण मालमत्तांचे मूल्यांकन करत,  टप्या टप्याने मुल्यांकन केलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यास न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. एचडीआयएलची आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत चार हजार कोटींच्या मालमत्तांवर टाच आणली होती.

या लिलावासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी "ना हरकत प्रमाणपञ" ही दिले आहे. त्यानुसार रिजर्व्ह बँकने राकेश व सारंग वाधवान यांच्या जप्त केलेल्या दोन विमाने व यॉटचा लिलाव करण्यात न्या. आर. के. राजेभोसले यांनी बुधवारी प्रशासकांचा अर्ज मान्य करून या मालमत्तांच्या विक्रीला मान्यता दिली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा