उद्धव ठाकरेंच्या 'त्या' 170 रक्षकांचे रिपोर्ट निगेटिव्ह


उद्धव ठाकरेंच्या 'त्या' 170 रक्षकांचे रिपोर्ट निगेटिव्ह
SHARES

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याजवळ असलेला चहा वाल्याला कोरोना झाल्याचे उघडकिस आल्यानंतर प्रशासनाने ठाकरेंच्यै सर्व सुरक्षा रक्षकांची तपासणी केली. या सर्व 170 सुरक्षा रक्षकांचे रिपोर्ट आता निगेटिव्ह आले आहेत. या सर्वांना आता होम क्वारन्टाईन केले आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कलानगर येथील 'मातोश्री' निवासस्थानाजवळ असलेल्या चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आणि एकच खळबळ उडाली. त्याच्यावर जोगेश्वरी येथील हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात  उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे याच चहा वाल्याकडे ठाकरेंच्या बंगल्यावर असलेले सुरक्षा रक्षक चहा पिण्यासाठी गर्दी करायचे.  चहा वाल्याचा रिपोर्ट पाँझिटिव्ह   आल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्यांची शोध सुरू झाला. आरोग्य विभागाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार ठाकरेंच्या सुरक्षेस असलेल्या 170 जणांना  वांद्रे (पूर्व) येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.


या सुरक्षा रक्षकांचे रिपोर्ट आज हाथी आले असून ते निगेटिव्ह आहेत. माञ तरी ही या सर्वांना काही दिवसांसाठी होम क्वारन्टाईन केले आहे. तर ठाकरेंच्या सुरक्षेसाठी नवीन सुरक्षा रक्षकांची फौज तैनात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रकारानंतर उद्धव ठाकरेंनी ही स्वत:ची काळजी घेण्यास सुरूवात केली आहे. ठाकरे त्यांची गाडी स्वत:च चालवत असून त्या गाडीत इतर कुणी ही नसते. काही दिवसांपूर्वीच त्याचा गाडी चालवतानाचा व्हिडिओ वायरल झाला होता.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा