मॅरेथॉन टॉवरमध्ये फटाक्यामुळे आग

लोअर परळ - मॅरेथॉन टॉवर इमारतीत मंगळवारी रात्री ११च्या सुमारास चौथ्या मजल्यावर फटाक्यामुळे आग लागली. टॉवरमधल्या कर्मचाऱ्यांनी फटाक्यांची आतशबाजी केली होती. त्यातला एक फटाका चौथ्या मजल्यावरील एसीच्या फॅनमध्ये अडकला आणि आगीचा भडका उडाला. ही आग झपाट्याने पसरत ७ व्या मजल्यापर्यँत गेली. त्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणली. सुदैवानं आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याचं सांगण्यात आलं.

Loading Comments