रक्तचंदन तस्करीप्रकरणी सहाव्या आरोपीला अटक

पोलिसांनी यापूर्वी केलेल्या पाच जणांच्या अटकेनंतर यातील एक आरोपी मिरारोड परिसरात रहात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

रक्तचंदन तस्करीप्रकरणी सहाव्या आरोपीला अटक
SHARES
कोट्यावधी रुपयांच्या रक्तचंदनाची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांनी शहजाद आलम सय्यद (३८) याला मिरारोडहून अटक केली आहे. या प्रकरणातील हा सहावा आरोपी आहे. या तस्करीत त्याची दलालाची भूमिका होती. या प्रकरणातील इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

पश्चिम उपनगरातल्या सांताक्रूझ परिसरात एक टोळी रक्तचंदनाची तस्करी करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सांताक्रूझ येथे दोन टेम्पोवर कारवाई करत, असगर इस्माईल शेख (४९) अली शेख (३२) व वाजिद अब्बा अन्सारी(३२) यांच्यासह १५५६ किलोे रक्तचंदन हस्तगत केले. हे रक्तचंदन आंध्र प्रदेशच्या जंगलातून चेन्नईला आणि चेन्नईमार्गे मुंबई व इतर ठिकाणी पाठवलं जायचं. तपासात पुढे पोलिसांनी मोहम्मद अली मोहम्मदीन (३२), दिलीप कुमार जैन उर्फ मनोज (५६) या दोघांनाही अटक केली.

पोलिसांनी या पूर्वी केलेल्या पाच जणांच्या अटकेनंतर यातील एक आरोपी मिरारोड परिसरात रहात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शहजादला बुधवारी अटक केली. या तस्करीमागे नक्षली व्यक्तीचा हात असल्याचा संशय पोलिसांना असून त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.



हेही वाचा -

प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने लिहिल्या शेकडो चिठ्ठ्या




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा