व्हाॅट्सअॅपच्या जमान्यातही 'त्याने' प्रेयसीला लिहिल्या शेकडो चिठ्ठ्या

तरुणीने त्या चिठ्ठ्यांना कोणताही प्रतिसाद न दिल्याने खजुरेला संतप्त झाला. त्यानंतर त्याने तरुणीची वाट अडवत तिला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

व्हाॅट्सअॅपच्या जमान्यातही 'त्याने' प्रेयसीला लिहिल्या शेकडो चिठ्ठ्या
SHARES
प्रेम व्यक्त करण्यासाठी कित्येक महिने तरुणीचा पाठलाग करत शेकडो चिठ्ठ्या लिहिणाऱ्या माथेफिरू रोडरोमिओला कुरार पोलिसांनी अटक केली आहे. संतोष खजुरे (१९) असं या आरोपीचं नाव आहे.

कुरार गाव परिसरात राहणारी तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेते. मागील अनेक महिन्यांपासून पीडित तरुणीचा पाठलाग खजुरे करत होता. ही बाब लक्षात आल्यानंतरही तरुणीने त्याकडं दुर्लक्ष केलं. एवढ्यावरच न खांबता खजुरेने तरुणीची वाट अडवत तिला चिठ्ठ्या देण्यास सुरूवात केली. प्रत्येक चिट्टीत 'आय लव्ह यू' व्यतिरिक्त काहीही लिहिलेलं नसायचं. त्याने कित्येक महिने तरुणीची वाट अडवत अशा शेकडो चिठ्ठ्या दिल्या. 

तरुणीने त्या चिठ्ठ्यांना कोणताही प्रतिसाद न दिल्याने खजुरेला संतप्त झाला. त्यानंतर त्याने तरुणीची वाट अडवत तिला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर मुलीने ही बाब तिच्या घरातल्यांना सांगितली. या प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार कुरार पोलिसांनी संतोष खजुरे याला ३५४ (ड) १२, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली.हेही वाचा -

चेंबूरमध्ये झाड पडून तिघं जखमी, जखमींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश

मुंबईत आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा, सहा जणांना अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा