अफवा पसरवणाऱ्या ४१९ जणांवर गुन्हे दाखल


अफवा पसरवणाऱ्या ४१९ जणांवर गुन्हे दाखल
SHARES
लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये,काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ४१९ गुन्हे दाखल झाले असून २२३ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७५ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. tiktok विडिओ शेअर प्रकरणी २० गुन्हे व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत. इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ व अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत २२३ आरोपींना अटक केली आहे . तसेच  १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .

पोर्नोग्राफिक वेबसाईट सावधान

सध्या लॉकडाउनच्या काळात इंटरनेटवापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे ,त्यामध्ये मध्यमवयीन व्यक्तींचा मुख्यतः समावेश आहे . अशा व्यक्ती बऱ्याचदा चुकून किंवा अन्य कुतूहलापोटी पोर्नोग्राफिक वेबसाईटवर क्लिक करतात व कालांतराने त्यानां एक मेसेज वा ई-मेल येतो कि ज्यात असे लिहले असते 'आम्हाला माहिती आहे तुम्ही कोणत्या वेबसाईट बघत होतात व आम्ही ते प्रदर्शित करू शकतो आणि तसे नको असल्यास एका विशिष्ट अकाउंट मध्ये काही रक्कम भरा इत्यादी '.आपण चुकून किंवा कुठल्याही प्रकारच्या अशा पोर्नोग्राफिक वेबसाईटवर क्लिक करू नका . सदर वेबसाईट या सेफ नसून कधीतरी तुमच्या नकळत अशा वेबसाईटवरून एखादे Ransomware किंवा व्हायरस डाउनलोड होऊ शकतो जो तुमच्या इंटरनेटवरील गतिविधी व तुमच्या कॉम्पुटरमधील माहिती जमा करून सायबर भामट्यानां पाठवतो आणि मग असे मेसेज येतात . जर कोणत्याही व्यक्तीस वरील नमूद मजकूर असणाऱ्या आशयाचे मेसेजेस आले तर घाबरून जाण्याचे कारण नाही ,आपण आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची तक्रार नोंदवा व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील याची माहिती द्या . तसेच सर्व नागरिकांनी हे पण लक्षात ठेवणे अत्यंत जरुरीचे आहे कि आपल्या देशात माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम ६७ब अनवये child pornography शोधणे देखील  गुन्हा आहे. केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभाग विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या वतीने     करण्यात आले आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा