मंत्रालयात नोकरीचे आमिष दखवून गंडा

 Vidhan Bhavan
मंत्रालयात नोकरीचे आमिष दखवून गंडा

नरिमन पॉईंट - समाज कल्याण विभागात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणाकडून १० लाख रुपये उकळणाऱ्या अजित बेडगे याला पोलिसांनी नुकतीच अटक केली. पोलीस चौकशीत त्याने आतापर्यंत डझनभर तरुणांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या फिर्यादी तरुणाची शिक्षणादरम्यान पुण्याच्या हनुमंत धायगुडे याच्यासोबत ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपी बेडगे याने धायगुडेच्या मदतीने या तरुणाला गाठले. त्याला मंत्रालयातील समाजकल्याण विभागात निरीक्षक पदावर नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. हे काम करण्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली.

मग या दोघांनीही त्या तरुणाला ५ लाख २० हजार रुपये घेऊन ७ आॅगस्ट रोजी मंत्रालय परिसरात बोलावले. या वेळी समाज कल्याण विभागातील सचिवांचा शिक्का असलेले खोटे पत्र त्याला दिले. मात्र पैसे देऊनही नोकरी न मिळाल्याने अखेर या तरुणाने मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे गाठून याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अजित बेडगे आणि धायगुडे यांनी पुण्यातून अटक केली. दरम्यान, दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे.

Loading Comments