बुटात सापडलं 30 लाखांचं सोनं

Sahar airport
बुटात सापडलं 30 लाखांचं सोनं
बुटात सापडलं 30 लाखांचं सोनं
बुटात सापडलं 30 लाखांचं सोनं
See all
मुंबई  -  

मुंबउ विमानतळावरील कस्टम विभागाने दुबईवरून येणाऱ्या प्रवाशाच्या बुटातून 1 किलो सोनं जप्त केले आहे. अयास अहमद हाफिजुल्ला अंसारी(51) असं या प्रवाशाचे नाव असून त्याचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा तसेच टेक्सटाईल फॅब्रिकचा व्यवसाय आहे. शनिवारी सकाळी अहमद मुंबई विमानतळावर उतरला असता कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले. 

अधिकाऱ्यांनी या प्रवाशाची झाडाझडती केली असता त्याच्या बुटात तब्बल 30 लाखांची सोन्याची बिस्किटं सापडली. दरम्यान अहमदने आपला गुन्हा कबूल केला असून, सोन्याची तस्करी करण्याच्या हेतूने अहमद 3 एप्रिलला दुबईला गेल्याचा दावा कस्टमने केला आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.