सायबर चोरट्यांचा ७४ लाखांवर डल्ला; दोघांना अटक

ई-बिलिंग सोल्युशन या कंपनीत गोपाळकृष्ण हा आरोपी कामाला होता. तर प्रदीप हा माजी कर्मचारी आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी कंपनीच्या सर्व यंत्रणांत छेडछाड करून त्यातील ई-मेलची माहिती बदलली. कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची रक्कम त्यांनी उघडलेल्या बनावट खात्यांमध्ये वळवून या दोघांनी कंपनीला तब्बल ७३ लाख रुपयांना चुना लावला.

सायबर चोरट्यांचा ७४ लाखांवर डल्ला; दोघांना अटक
SHARES

 ई-बिलिंग सोल्युशन कंपनीच्या खात्यातील ७४ लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या दोघांना सायबर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. गोकुळकृष्णन बी. आणि प्रदीप कुमार अशी या आरोपींची नावे आहेत.  दोघांनी बनावट कागदपत्रांच्या मदतीने फसवणूक केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. आरोपींनी हस्तांतरित केलेली खाती आर्थिक गुन्हे शाखा आणि सरकारी यंत्रणेच्या मदतीनं गोठवण्यात आली आहेत.


ई-मेलची माहिती बदलली

ई-बिलिंग सोल्युशन या कंपनीत गोपाळकृष्ण हा आरोपी कामाला होता. तर प्रदीप हा माजी कर्मचारी आहे. दोघेही कंपनीच्या चेन्नई  येथील कार्यालयात  काम करत होते. कित्येक वर्ष एकाच कंपनीत काढल्यानंतर कंपनीच्या अनेक व्यवहारांची इत्यंभूत माहिती दोघांना होती. झटपट श्रीमंत होण्यासाठी कंपनीच्या सर्व यंत्रणांत छेडछाड करून त्यातील ई-मेलची माहिती बदलली. कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची रक्कम त्यांनी उघडलेल्या बनावट खात्यांमध्ये वळवून या दोघांनी कंपनीला तब्बल ७३ लाख रुपयांना चुना लावला.


खातं गोठवलं 

कालांतराने त्यांनी कंपनीचं बनावट खातं बंद करून बंद केलेलं खातं पुन्हा सुरू करत व्यवहार पूर्वीप्रमाणे होत असल्याचं दाखवलं. याबाबतची माहिती कंपनीला मिळाल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणाच्या प्राथमीक तपासात आरोपींचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्यांना सायबर पोलिसांनी अटक केली. हस्तांतरित केलेले १० लाख रुपये असलेलं खातं गोठवण्यात अालं अाहे.



हेही वाचा -

अंधेरीत ३२ लाखांच्या कोकेनसह नायजेरियनला अटक

जोगेश्वरीतील हाॅटेलमध्ये आढळला आयआयटीतील विद्यार्थ्याचा मृतदेह



 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा