अंधेरीत ३२ लाखांच्या कोकेनसह नायजेरियनला अटक


अंधेरीत ३२ लाखांच्या कोकेनसह नायजेरियनला अटक
SHARES

मुंबईच्या अंधेरी परिसरातील उच्चभ्रू वस्तीतल्या तरुणांना कोकेन या अंमली पदार्थाची तस्करी करण्यासाठी आलेल्या नायजेरियन तरूणाला अंबोली पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ४७२ ग्रॅम कोकेनसह हस्तगत करण्यात आलं आहे. या कोकेनची किंमत बाजारभावानुसार ३७ लाख ७६ हजार इतकी असल्याची माहिती अंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत गायकवाड यांनी दिली.


अंधेरीत अंमली पदार्थांची तस्करी

मुंबईच्या अंधेरी परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी तस्कर येत असल्याचं पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईतून सिद्ध झालं आहे. पोलिसांनी या तस्करांभोवती फास आवळल्यानंतर अनेकांनी छुप्या पद्धतीने तस्करी करत आहेत. दरम्यान जोगेश्वरीच्या सहकार रोड परिसरात एक नायजेरियन अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक दया नायक यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता.


'अशी' केली अटक

त्यानुसार एक नायझेरियन त्या भागात संशयास्पद फिरत असताना पोलिसांनी त्याला हटकत ताब्यात घेतलं. अंगझडतीत त्याच्या बॅगेत ४७२ ग्रॅम कोकेन आढळून आलं. या कोकेनची किंमत बाजारात ३२ लाख ७६ हजार इतकी आहे. या प्रकरणी पोलिसांनी फेमी ओल्युयंका ओपयेमी ख्री (२९) याच्या विरोधात अंमली पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.



हेही वाचा-

जोगेश्वरीतील हाॅटेलमध्ये आढळला आयआयटीतील विद्यार्थ्याचा मृतदेह

वृद्ध मालकिणीला मारण्यासाठी रोज जेवणातून विष



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा