वृद्ध मालकिणीला मारण्यासाठी रोज जेवणातून विष

मागील अनेक दिवसांपासून खाजोटिया यांना जेवल्यानंतर गुंगी येऊन त्या क्षणार्धात झोपी जायच्या. आॅगस्ट महिन्यात त्यांची मुलगी अमेरिकेहून आली होती. तिलाही जेवल्यानंतर गुंगी येऊन झोप येऊ लागली. मात्र, सुरूवातीला त्यांनी याकडं दुर्लक्ष केलं.

वृद्ध मालकिणीला मारण्यासाठी रोज जेवणातून विष
SHARES

कुलाब्यात एका उच्चभ्रू कुटुंबातील महिलेला मारून तिचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं भासवून घर लुटण्याच्या प्रयत्नात असलेल्या नोकराला कुलाबा पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.  रियाल मंडल उर्फ मिलाॅन (३३) असं या आरोपीचे नाव आहे.  


जेवल्यानंतर गुंगी 

कुलाबाच्या बख्तावर इमारतीत झिनिया खाजोटिया (६५) ही वृद्ध महिला दोन्ही मुले परदेशात व्यवसायानिमित्त असल्याने एकटी राहते.  वयोमानानुसार हात चालत नसल्यामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वी रियाल आणि अन्य एका नोकराला कामावर ठेवले होते. दोघेही खाजोटिया यांच्यासोबत राहत होते. मागील अनेक दिवसांपासून खाजोटिया यांना जेवल्यानंतर गुंगी येऊन त्या क्षणार्धात झोपी जायच्या. आॅगस्ट महिन्यात त्यांची मुलगी अमेरिकेहून आली होती. तिलाही जेवल्यानंतर गुंगी येऊन झोप येऊ लागली. मात्र, सुरूवातीला त्यांनी याकडं दुर्लक्ष केलं.


उंदीर मारण्याचं औषध 

 मागील पंधरा दिवसानंतर दोघींना अशक्तपणा जाणवू लागल्यानंतर त्यांनी टाटा रुग्णालयातील ओळखीच्या डाॅक्टरकडे तपासणी केली. यावेळी डाॅक्टरांकडून मिळालेल्या अहवालानुसार दोघींच्या रक्तामध्ये 'थॅलियम' हा विषारी पदार्थ आढळून आला. हा विषारी पदार्थ उंदीर मारण्यासाठी वापरला जातो.  जेवणातून ते देण्यात आल्याचं वैद्यकीय अहवालात सिद्ध झाल्यानंतर झिनिया यांनी कुलाबा पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी करून रियाल याला अटक केली. रियालच्या कटात दुसऱ्या नोकराचाही समावेश आहे का याबाबत कुलाबा पोलिस तपास करत आहेत.



हेही वाचा -

अमरावतीत शिजला श्याम मानव यांच्या हत्येचा कट

नक्षल कनेक्शन प्रकरण: पत्रकार परिषद पोलिसांना भोवणार?




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा