अमरावतीत शिजला श्याम मानव यांच्या हत्येचा कट

श्याम मानव यांचं जास्त वास्तव्य हे मुंबईत असतं. मुंबईत त्यांना मारणं शक्य नसल्यामुळे श्याम मानव यांच्या राज्यातील दौऱ्यांवर आरोपी लक्ष ठेवून होते. सामाजिक कामानिमित्त ते विदर्भातील अमरावतीत आल्यानंतर त्या ठिकाणी संधी साधून त्यांचा काटा काढण्याचा आरोपींनी कट रचला होता.

अमरावतीत शिजला श्याम मानव यांच्या हत्येचा कट
SHARES

मूळचे विदर्भाचे असलेले श्याम मानव हे नेहमीच कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या रडारवर होते. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येनंतर राज्यभरात कट्टर हिंदुत्ववादी संघटनांवर टीका होऊ लागल्या. यामध्ये शाम मानव यांची प्रमुख भूमिका ठरत असल्यामुळे श्याम मानव यांची अमरावतीतच हत्या घडवून आणण्याचा कट रचल्याचं आरोपींच्या चौकशीत पुढं आल्याचं महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पोलिसांनी न्यायालयात सांगितलं.


दौऱ्यांवर आरोपींचं लक्ष

हत्या घडवून अाणण्यासाठी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि अचूक नियोजन गरजेचं होतं. या नियोजनासाठी लागणाऱ्या पैशांची मदत श्रीकांत पांगारकरकडून केली जात होती. मात्र, श्याम मानव यांचं जास्त वास्तव्य हे मुंबईत असतं. मुंबईत त्यांना मारणं शक्य नसल्यामुळे श्याम मानव यांच्या राज्यातील दौऱ्यांवर आरोपी लक्ष ठेवून होते. सामाजिक कामानिमित्त ते विदर्भातील अमरावतीत आल्यानंतर त्या ठिकाणी संधी साधून त्यांचा काटा काढण्याचा आरोपींनी कट रचला होता.

आरोपींना जालन्यात प्रशिक्षण

यासाठी आरोपींना जालन्यात प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती एटीएसने न्यायालयाला दिली. जालन्यातच पांगारकरने व्यवस्था केलेल्या ठिकाणी आरोपींना बाॅम्ब बनवण्याचं आणि शस्त्रे चालवण्याचं प्रशिक्षण दिलं.  यापूर्वीही पांगारकरवर १९९८ पासून ते २००५ दरम्यान जालन्यातील कदीम जालना पोलिस ठाण्यात पाच गुन्ह्यांची नोंद आहे.  यात दंगल घडविणे, सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.


प्राजी नावाने उल्लेख

पुरावा म्हणून एटीएसने न्यायालयात आरोपींचे काॅल डिटेल्स आणि टाॅवर लोकेशनही सादर केले. आरोपी अमोल काळेच्या संपर्कात असल्याचं उघड झाल्याचं एटीएसच्या पथकाने न्यायालयात सांगितलं. त्याचबरोबर आरोपींनी काळेला केलेले संदेशही एटीएसला मिळाले आहेत. गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपास करत असलेल्या कर्नाटकच्या विशेष पथकाकडून पांगारकरबाबत माहिती मागवण्यात आली होती. त्यात विशेष पथकाने अटक केलेल्या अन्य आरोपींकडून जप्त केलेल्या डायरीत पांगारकरचा प्राजी या नावाने उल्लेख असल्याचंही उघड झालं अाहे.


बँक खात्यांची माहिती

पांगारकरच्या तीन बँक खात्यांमधून झालेला आर्थिक व्यवहाराची माहिती एटीएसने मिळवली अाहे.  यामध्ये बँक आॅफ महाराष्ट्रच्या २०१७ ते २०१८, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या २०१० ते २०१८ आणि सुंदरलाल सावजी अर्बन को. आॅप. बँकेतील २००६ ते २०१८ मधील आर्थिक व्यवहारांचा समावेश आहे. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचं एटीएसने सांगितलं.



हेही वाचा -

नक्षल कनेक्शन प्रकरण : पोलिसांविरोधात आणखी एक जनहित याचिका

वर्सोवा समुद्रात बुडालेले तिघे वाचले, एकजण बेपत्ता




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा