गोरेगावमध्ये सायबर क्राइमबाबत जनजागृती

 Goregaon
गोरेगावमध्ये सायबर क्राइमबाबत जनजागृती
गोरेगावमध्ये सायबर क्राइमबाबत जनजागृती
See all

गोरेगाव - सायबर क्राइमच्या अधिकाऱ्यांनी गोरेगावच्या सामाजिक कार्यकते, नागरिक, पोलिसांना अॉनलाइन फसवणूक कशी होते आणि ती टळण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती दिली. वनराई पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी हा कार्यक्रम झाला.

या वेळी सायबर क्राइमचे एपीआय लोंढे आणि वरिष्ठ निरिक्षक जोश्ना रासमही उपस्थित होत्या. सायबर क्राइम म्हणजे काय? आपली फसवणूक होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी, फेसबुक, व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मीडियावर फसवे मेसेज येतात, त्याला भुरळून जाऊ नये. अॉनलाइन पैशांचा व्यवहार करताना ओटीपी नंबर कुणालाही सांगू नये, बँक अकाउंटची माहिती कुणालाही फोनवर देऊ नये, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

Loading Comments