मुलुंडमध्ये डान्सबारवर पोलिसांची धाड


मुलुंडमध्ये डान्सबारवर पोलिसांची धाड
SHARES

मुंबईत अनेक ठिकाणी गुप्तपणे विनापरवाना डान्सबार चालवले जात आहेत. असाच डान्सबार मुलुंडमध्येही रात्रीच्या वेळी चालवला जात होता. पण गुरुवारी रात्री पोलिसांनी मुलुंड पश्चिम येथे असलेल्या चंचल बारवर धाड टाकली. या धाडीमुळे बारमध्ये सर्वत्र गोंधळ उडाला.


सापळा रचून पोलिसांची कारवाई

अचानक टाकलेल्या या धाडीत पोलिसांनी बार डान्सर म्हणून काम करणाऱ्या तब्बल 37 मुली, बारमधील 14 इतर कर्मचारी आणि तिथे उपस्थित 16 ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. मुलुंड पोलिस ठाण्याच्या झोन 7 मधील स्कॉडने ही कारवाई केली.

गुप्त बातमीदारांमार्फत पोलिसांना या बारमध्ये गैर प्रकार होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली.


ताब्यात घेतलेल्या या सर्वांची कसून चौकशी सुरू असून चौकशी केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी दिली.


हेही वाचा - 

शहरात पुन्हा छमछम



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा