• शहरात पुन्हा छमछम
SHARE

मुंबई - शहरातील छमछम पुन्हा एकदा सुरू होणार हे 24 नोव्हेंबरला वडाळातल्या श्रीराम इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झालंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शहरातील डान्सबार हे पुन्हा जुन्या नियमांनुसार सुरू राहणार आहेत. 'आहार इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन' यांच्या वतीनं घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेले सर्व मुद्दे या वेळी स्पष्ट करण्यात आलेत. यामध्ये प्रत्येक डान्सबारच्या प्रवेश आणि बाहेर येण्याच्या मार्गावर कॅमेरा बसवला जाणार असून डान्सबार हे रात्री एक वाजेपर्यंत सुरू राहतील. याशिवाय बार सुरू करण्याचा परवाना नसल्यास तो लागू करून घ्यावा असंही सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलंय.

त्याचबरोबर शहरातील 33 डान्सबारने आपले परवाने नूतनीकरणास दिले असून तीन डान्सबारचे परवाने मंजूर करण्यात आलेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या