दाऊदच्या आणखी एका हस्तकाला अटक

मुंबईतील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी अनिसकडून धमकवण्यात आलं होतं. या प्रकरणी त्याने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली. तपासात ही धमकी अनिसचा हस्तक रामदास रहाणे याने दिल्याचं निष्पन्न झालं.

दाऊदच्या आणखी एका हस्तकाला अटक
SHARES

कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या कुटुंबातील दोन सदस्यांना बेड्या ठोकल्यानंतर टोळीतील इतर हस्तकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. मुंबईच्या खंडणी विरोधी पथकांच्या पोलिसांनी मंगळवारी  गँगस्टर अनिस इब्राहिम याचा हस्तक मोहम्मद अल्ताफ अब्दुल लतीफ सईद याला सोमवारी केरळमधील विमानतळावरून अटक केली. या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाचे पोलिस अधिक तपास करत आहेत.


खंडणीसाठी धमकी

मुंबईतील एका नामांकित हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी अनिसकडून धमकवण्यात आलं होतं. या प्रकरणी त्याने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार नोंदवली. तपासात ही धमकी अनिसचा हस्तक रामदास रहाणे याने दिल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार गुन्हा दाखल करत खंडणीविरोधी पथकाने चार आरोपींना अटक केली होती. त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दुबई येथे राहणारा मोहम्मद सईद हा अनिसचे व्यवहार सांभाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तेव्हापासून पोलिस सईदवर नजर ठेवून होते. पोलिसांनी सईद विरोधात सर्व विमानतळावर लूक आऊट नोटीस ही जारी केली होती. याच दरम्यान सोमवारी सईद केरळ विमानतळावर उतरला. त्यावेळी ओळख परेडमध्ये इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं. सोमवारी सईदला केरळमधून खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.



हेही वाचा  -

३० वर्षानंतर पोलिस कोठडीतील हत्येचा उलगडा, सीसीटिव्हीसमोर निवृत्त अधिकारी बरळला

एकतर्फी प्रेमातून तरुणीला डांबून चाकू हल्ला




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा