३० वर्षानंतर पोलिस कोठडीतील हत्येचा उलगडा, सीसीटिव्हीसमोर निवृत्त अधिकारी बरळला

निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने ९० च्या दशकात रट्टू गोसावी या सराईत गुन्हेगाराला अटक केली होती. त्याच्यावर चोरीसह २७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान रट्टूला जबर मारहाण केली.

३० वर्षानंतर पोलिस कोठडीतील हत्येचा उलगडा, सीसीटिव्हीसमोर निवृत्त अधिकारी बरळला
SHARES

३० वर्षापूर्वी पोलिस कोठडीत आरोपीचा मारहाणीत मृत्यू झाला होता. मात्र आरोपी आजारी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याची कबुली एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने दिली. या निवृत्त अधिकाऱ्याचे सर्व रेकाॅर्डिंग सीसीटिव्हीत कैद झालं आहे. ३० वर्षानंतर आता या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखा १ कडून केली जात आहे. 

 तक्रारदार राजेंद्र ठक्कर यांच्या मालाड येथील कार्यालयात हा निवृत्त पोलिस अधिकारी १५ आॅक्टोंबर २०१८ रोजी आला होता. त्यांच्यासोबत एका पोलिस अधिकारीही होता. त्यावेळी निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने ठक्कर, त्याचे मित्र आणि पोलिस अधिकाऱ्यासमोर एका आरोपीचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर त्याचा आजारपणात मृत्यू झाला असल्याचं दाखवत गुन्ह्यावर कशा प्रकारे पांघरून घातलं, याची कहाणी सांगितली. त्या निवृत्त अधिकाऱ्याचा हा सर्व व्हिडिओ ठक्कर यांच्या कार्यालयातील सीसीटिव्हीत कैद झाला. 

 निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने ९० च्या दशकात रट्टू गोसावी या सराईत गुन्हेगाराला अटक केली होती. त्याच्यावर चोरीसह २७ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यावेळी अधिकाऱ्यांनी चौकशीदरम्यान रट्टूला जबर मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी अधिकाऱ्याने त्याला जे.जे.रुग्णालयात हलवले. आरोपीला पकडताना त्याने पहिल्या माळ्यावरून उडी टाकल्याने तो गंभीर जखमी झाल्याचे दाखवण्यात आले. तसंच त्याच्यावर खोटे उपचार केल्याचं दाखवून त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचा बनाव रचल्याचे अधिकारी उपस्थितांना सांगत होता. या प्रकरणाचा सीसीटिव्ही सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोचल्यानंतर या प्रकरणी पुन्हा चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.   



हेही वाचा - 

एकतर्फी प्रेमातून तरुणीला डांबून चाकू हल्ला

बेकायदा टेलीफोन एक्स्चेंज चालवणाऱ्या ७ जणांना अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा