COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

एकतर्फी प्रेमातून तरुणीला डांबून चाकू हल्ला

तिला दुचाकीवर बसवून त्याने स्वतःच्या घरी आणले. घरात या दोघांमध्ये कडाक्‍याचे भांडण सुरू झाले. रागाच्या भरात त्याने भाजी कापण्याच्या चाकूने या तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली.

एकतर्फी प्रेमातून तरुणीला डांबून चाकू हल्ला
SHARES

एकतर्फी प्रेमातून ना. . जोशी मार्ग येथे २५ वर्षीय तरुणाने मुलीला डांबून ठेवत तिच्यावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वेळीच मुलाच्या शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून मुलीचे प्राण वाचवले. या प्रकरणी ना..जोशी मार्ग पोलिसांनी अक्षय कदम याला अटक केली आहे. जखमी तरुणीवर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धोबीघाट परिसरात राहणाऱ्या अक्षय मंगेश कदम याचे या २२ वर्षांच्या तरुणीसोबत २०१६ पासून प्रेमसंबंध होते. मात्र काही महिन्यांपूर्वी अक्षयच्या वागण्याला कंटाळून तरुणीने त्याच्याशी संबध तोडले. तिने त्याचा मोबाइल नंबरही ब्लाॅक केला होता. त्यामुळे अन्य तरुणाशी तरुणीचे संबध असल्याचा संशय अक्षयला होता. शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून जात असताना त्याने धोबीघाट परिसरात या तरुणीला गाठलं. तिला दुचाकीवर बसवून त्याने स्वतःच्या घरी आणलं. घरात या दोघांमध्ये कडाक्‍याचं भांडण सुरू झालं. रागाच्या भरात त्याने भाजी कापण्याच्या चाकूने या तरुणीवर वार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तो स्वतःवरही वार करून घेत होता. या तरुणीचा आक्रोश ऐकून शेजारी त्याच्या घराबाहेर जमा झाले. त्यांनी वारंवार सांगूनही अक्षयने घराचा दरवाजा उघडला नाही. अखेर शेजाऱ्यांनी दरवाजाची कडी तोडून त्याच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी ही तरुणी जखमी अवस्थेत आढळली. 

अक्षयने चाकूने गंभीर जखमा केल्यामुळे तरुणीला तातडीने नायर रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणाची माहिती मिळताच ना. . जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कदमला पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्या हातावर चाकूने कापल्याच्या जखमा होत्या. याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून अक्षयला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीहेही वाचा -

बेकायदा टेलीफोन एक्स्चेंज चालवणाऱ्या ७ जणांना अटक

एजंट स्मिथची आहे तुमच्या खात्यातील पैशांवर नजर
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा