दाऊदची मालमत्ता जप्त करण्यात कायदेशीर अडचणी - पडसलगीकर


दाऊदची मालमत्ता जप्त करण्यात कायदेशीर अडचणी - पडसलगीकर
SHARES

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याच्या लंडन येथील संपत्तीवर तपास यंत्रणानी टाच आणल्यानंतर मुंबईतील त्याच्या मालमत्तांच काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण दाऊदच्या संपत्तीबाबत कायदेशीर अडचणी असल्याने, ही संपत्ती जप्त करता येत नाही, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली. बुधवारी पत्रकारांशी अनौपचारीक गप्पा मारताना त्यांनी याबाबत मत व्यक्त केले.

१२ मार्च १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा मास्टर माईंड तसेच अंडरवर्ल्डचा बादशहा असलेल्या दाऊदच्या नाड्या आवळण्यास तपास यंत्रणांनी सुरु केले आहे. याचाच परिपाक म्हणून लंडन येथे दाऊदची ४ हजार कोटी रुपयांची संपत्ती तपास यंत्रणानी जप्त केली आहे.

जप्त केलेल्या या मालमत्तेचा दोन वर्षांपूर्वी लिलाव देखील करण्यात आला होता. यामध्ये पाकमोडीया स्ट्रिटवरील मालमत्तेचा समावेश होता. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी दाऊदची मालमत्ता आहे. अशा अनेक ठिकाणी कायदेशीर अडचणी असल्याने, या संपत्तीवर टाच आणण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. मात्र त्यातून देखील मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे देखील ते पुढे म्हणाले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा