वसईत भर रस्त्यात तरूणाकडून प्रेयसीची हत्या

पानाचा वापर करत तिच्यावर भर रस्त्यात हल्ला करण्यात आला. याचा व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहे.

वसईत भर रस्त्यात तरूणाकडून प्रेयसीची हत्या
SHARES

वसईतील चिंचपाडा येथे मंगळवारी सकाळी एका तरुणीची तिच्या प्रियकराने वार करून निर्घृण हत्या केल्याची संतापजनक घटना घडली आहे. 29 वर्षीय हल्लेखोराने पीडितेच्या डोक्यावर आणि छातीवर वारंवार वार केले. दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर त्यांचे नुकतेच ब्रेकअप झाले होते.

मुलगी रस्त्यावर पडून होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पान्याने तिच्यावर वार केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओत तरूणीवर अचानक मागून हल्ला झालेला पाहायला मिळत आहे. अचनाक हल्ला झाल्याने तरूणी रस्त्यावरच पडली. पण तरूणाने रागाच्या भरात तिच्यावर पान्याने वार करणे चालूच ठेवले. तिच्या चोहऱ्यावर आणि छातीवर तो वार करतच होता. तिच्यावर पुन्हा हल्ला करण्यापूर्वी आणि शस्त्र टाकून देण्याआधी "क्यूं किया, क्यूं किया ऐसा मेरे साथ" असे तो ओरडत होता.

सर्वात धक्कादायक म्हणजे रस्त्यावर बऱ्यापैकी रहदारी होती. पण कोणीही आरोपीला अडवण्याचे धाडस करत नव्हते. अनेक जण या घटनेचा व्हिडिओ शूट करत होते. हिम्मत करून एका व्यक्तीने तरूणीला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्या व्यक्तीला देखील आरोपीने धमकावले. घाबरलेल्या व्यक्तीने पुन्हा वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. हल्ला इतका भीषण होता की तरूणीचा जागीच मृत्यू झाला.

पीडित तरुणी २० वर्षांची होती. तिचे नाव आरती होते. रोहित यादव नावाच्या आरोपीला स्थानिक पोलिसांनी तात्काळ अटक केली, असे टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात म्हटले आहे.



हेही वाचा

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजस्थानमधून एकाला अटक

ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आइस्क्रीममध्ये आढळले मानवी बोट

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा