गिरगावात गेस्ट हाऊसमध्ये इसमाचा मृत्यू

 BDD Chawl
गिरगावात गेस्ट हाऊसमध्ये इसमाचा मृत्यू

गिरगाव - येथील साई श्रद्धा गेस्ट हाऊसमध्ये 58 वर्षीय जहाँजेब फरामोश खान या 58 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. जहाँजेब खान हा सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता चहा घेतल्यानंतर रुममध्ये झोपला होता. दुपारी सर्व्हिस बॉयने चेक आऊटसाठी दरवाजा वाजवला असताना आतमधून कोणताही प्रतिसाद आला नाही. नंतर संध्याकाळी साडेसात ते रात्री साडे नऊ पर्यंत कोणताही प्रतिसाद न आल्याने मॅनेजर आणि सर्व्हिस बॉयने शेवटी दरवाजा धक्का मारून उघडला असता सदर इसम नग्न अवस्थेत आढळून आला. दरम्यान त्याला जे. जे. हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टर्सनी त्याला मृत घोषित केले. हृदय विकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर्सनी सांगितले.

Loading Comments