मुंबईत बनावट नोटांचा सुळसुळाट, व्यवहार करताना घ्या काळजी

कारवाईत तब्बल २ लाख ९५ हजार रुपयांच्या ५९० नोटा जप्त केलेल्या आहेत.

मुंबईत बनावट नोटांचा सुळसुळाट, व्यवहार करताना घ्या काळजी
SHARES

मुंबईत पाकिस्तान आणि तामिळनाडू मधून आलेल्या बनावट नोटांचे प्रकरण ताजे असतानाच गुन्हे शाखेने आणखी एक धडक कारवाई केलेली आहे.पाकिस्तानामार्गे काही दिवसांपूर्वीच २४ लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणखी एक कारवाई केलेली होती ज्यामध्ये १ लाख २८ हजारांच्या नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.. मात्र या करावाया झाल्यानंतरसुद्धा मुंबईत बनावट नोटांचं सत्र अद्यापही सुरूच आहे.


गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल २ लाख ९५ हजार रुपयांच्या ५९० नोटा जप्त केलेल्या आहेत. या नोटा स्वतःच छापून बाजारात परवसण्याच्या प्रयत्नात आरोपी होते. मात्र याआधीच गुन्हे शाखेने त्यांचा मनसुबा हाणून पाडलाय. या प्रकरणात अद्याप अजून एक आरोपी फरार आहे.अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना त्यानेच या सगळ्या प्रकरणात महत्वपूर्ण मदत केल्याचे उघड झालय. फरार आरोपी बनावट नोटा बनवण्याच्या प्रकरणात मास्टर माईड आहे. याआधी केरळमध्ये अश्याच एका प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. त्यांनतर जामिनावर सुटून आल्यानंतर पुन्हा एकदा बनावट नोटा बनवण्यात तो सक्रिय झाला होता. डॉन वरकी (२६ वर्षे) आणि विष्णू विजयन (२८) अशी या दोन अटक आरोपींची नाव असून ते नवी मुंबई परिसरात वास्तव्यास होते. या दोन्ही आरोपींना कोर्टाने १८ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय..



दोन्ही आरोपिना अटक केल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपींच्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणी धाडी टाकून बनावट नोटा बनवण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे..यामध्ये लॅपटॉप, प्रिंटर, टॅब, आरबीआय असे लिहिलेल्या पितळी पट्ट्या, वॉटरमार्क असलेले पेपर, आणि इतर साहित्याचा समावेश आहे.मुंबईत बाहेरून बनावट नोटा वारंवार येत असल्याचे समोर येत असल्याने हे प्रकार हाणून पाडण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी सक्रीय झाले आहेत.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा