मुंबईला हादरवणारा 'इंडियन लादेन' अखेर गजाआड

'इंडियन लादेन' नावाने परिचित असलेल्या अब्दुल सुदान कुरेशी या मोस्ट वाॅन्टेड दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांना गजाआड केलं आहे. अब्दुल मुंबईतील पायधुनी येथील पत्रावाला बिल्डींगमध्ये रहात होता.

मुंबईला हादरवणारा 'इंडियन लादेन' अखेर गजाआड
SHARES

मुंबई २००६, गुजरात २००८ आणि दिल्लीत २०१० मध्ये झालेल्या बाॅम्बस्फोटातील मास्टरमाईंड तसेच 'इंडियन लादेन' नावाने परिचित असलेल्या अब्दुल सुदान कुरेशी या मोस्ट वाॅन्टेड दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांना गजाआड केलं आहे. अब्दुल मुंबईतील पायधुनी येथील पत्रावाला बिल्डींगमध्ये रहात होता. तर मिरारोडच्या नयानगरमधील नरेंद्रनगरमध्येही त्याचं घर आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी(एनआयए) ने त्याच्यावर ४ लाखाचं बक्षीस ठेवलं होतं.


अनेक नावांनी परिचित

भारतातील अनेक मोस्ट वाॅऩ्टेड आरोपींपैकी एक म्हणून ओळखला जाणारा अब्दुल सुदान कुरेशी उर्फ कासिम उर्फ झाकीर उर्फ क्यू अशी त्याची ओळख आहे. या तिन्ही बाँम्बस्फोटानंतर अब्दुल 'इंडियन लादेन' म्हणून तो ओळखला जाऊ लागला.


'असा' घडवला मुंबईत बाॅम्बस्फोट

मुंबईच्या पश्चिम रेल्वेत ११ जुलै २००६ रोजी स्फोटात त्याचा सहभाग होता. हा स्फोट इतका भीषण होता की, अवघ्या ११ मिनिटांच्या काळात ७ साखळी बॉम्बस्फोटामध्ये १८९ प्रवासी मृत्युमुखी पडले होते. तर तब्बल ८२४ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी अनेकांना स्फोटामुळे कायमचं अपंगत्व आलं. या प्रकरणात पोलिसांनी कमाल अन्सारी, मोहम्मद फैजल शेख, ऐत्तेशाम सिद्दीकी, नावेद हुसेन खान, अासिफ खान, तन्वीर अन्सारी, जमीर शेख, मोहम्मद साजीद अन्सारी, सोहेल शेख, आलम शेख, मुझम्मिल शेख, मोहम्मद शफी यांना अटक केली होती. या प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने १३ पैकी १२ आरोपींना नुकतंच दोषी ठरविलं. या सर्वांच्या चौकशीतून 'सिमी' अतिरेकी संघटनेचा मास्टर माईंड अब्दुल नाव पुढं आलं होतं.


मुंबईनंतर गुजरात टार्गेट

मुंबईत मिळालेल्या यशानंतर अब्दुलने गुजरातमध्ये नोव्हेंबर २००८ मध्ये ७० मिनिटांत साखळी स्फोट घडवून आणले होते. त्यामध्ये ५६ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०० हून अधिक जण गंभीरित्या जखमी झाले होते. त्यानंतर २०१० मध्ये अब्दुलने स्लिपर सेलच्या माध्यमातून बाॅम्बस्फोट घडवून आणले होते. त्यात २४ जण ठार तर १०० हून अधिक जण गंभीर जखणी झाले होते. त्यानंतर अब्दुलची दहशत सर्वत्र पसरली.


हाय अलर्ट जारी

त्यानंतर फरार अब्दुल विरोधात लूक आऊट नोटीस जारी करत, मोस्ट वाॅन्टेड क्रिमिनलच्या यादीत त्याचं नाव नोंदवण्याच आलं. एनआयएने त्याची माहिती देणाऱ्यास ४ लाखाचं बक्षीस जाहीर केलं. अब्दुल सुदान कुरेशी हा साॅफ्टवेअर इंजिनिअर आहे. सोमवरी दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर अब्दुलच्या अटकेमुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा