दारू फेकायला सांगितल्याने पतीची आत्महत्या

 Kandivali
दारू फेकायला सांगितल्याने पतीची आत्महत्या

कांदिवली - पत्नीने दारू फेकण्यास सांगितल्याने पतीने आत्महत्या केल्याची घटना कांदिवलीच्या दामूनगरमध्ये घडली आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव रामचंद्र उमाशंकर यादव (33) असं आहे. 31 डिसेंबरला उमाशंकर घरी आला आणि सोबत येताना त्यांनी दारूच्या चार बॉटल आणल्या. या बॉटल पाहून त्याच्या पत्नीने त्याला विचारलं की एवढ्या बॉटल का? त्यावेळी त्याने बायकोला 31 डिसेंबरच्या रात्री पार्टी करायची आहे असं उत्तर दिले. मात्र पत्नीने बॉटल बाहेर ठेवण्यास सांगितल्यावर त्याचा पारा चढला. आणि याचाच राग मनात धरत उमाशंकरने घरात कुणी नसताना पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

Loading Comments