देवनार डम्पिंग ग्राउंडला पुन्हा लागली आग

 Deonar
देवनार डम्पिंग ग्राउंडला पुन्हा लागली आग

देवनार - पुन्हा एकदा देवनार डम्पिंग ग्राउंडला बुधवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. रफिकनगरमध्ये लागलेल्या या आगीमुळे मोठा धूर पसरला होता. मात्र अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

मागच्या वर्षीही देवनार डम्पिंग ग्राऊंडमध्ये भीषण आग लागली होती. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे आगीने रौद्र रुप धारण केलं होतं. त्यामुळे एक महिन्यापर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवता आलं नव्हतं. यासंदर्भात अग्निशमन दलाच्या कंट्रोल रुमला संपर्क साधले असता याबद्दल काहीच माहिती मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

Loading Comments