विमानात बाॅम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या महिलेला अटक


विमानात बाॅम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या महिलेला अटक
SHARES

मुंबई विमानतळावरील इंडिगोच्या विमानात बाॅम्ब असल्याची अफवा पसरवून सुरक्षा यंत्रणेला कामाला लावणाऱ्या माथेफिरू महिलेला विमानतळ पोलिसांनी शनिवारी रात्री ताब्यात घेतलं. उमा नारायण कन्नवसन असं या महिलेचं नाव आहे.


कशी पसरवली अफवा?

मुंबई विमानतळावर शनिवारी मुंबईहून लखनऊला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आपल्याच्या धमकीचा फोन आपल्याला आल्याची माहिती उमाने टर्मिनस-१ वरील सुरक्षा यंत्रणेला दिली होती. इंडिगोचं ६ ई-३६१२ हे विमान सकाळी सहा ६.०५ वाजता उड्डाण घेणार होतं.


खोटी माहिती

मात्र या अफवेमुळे सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. संपूर्ण विमान सुरक्षेच्या कारणास्तव खाली करण्यात आलं. त्यानंतर संपूर्ण विमानाची बाॅम्ब शोधक पथकाने श्वान आणि यंत्रणेच्या सहाय्याने तपासणी केली. मात्र त्यांना कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही. त्यामुळे खोटी माहिती दिल्यामुळे सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांनी उमाला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिलं. तिचे मानसिक संतुलन ठीक नसल्याने तिने हे कृत्य केलं असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.हेही वाचा-

इंडिगोच्या विमानात बाॅम्ब ठेवल्याची अफवा, २ तास उशीराने विमान दिल्लीकडे झेपावलं

'एमएमआरडीए'ने घेतला मोनोरेलचा ताबा, स्कोमी, एल अँड टीची हाकालपट्टीRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा