Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
58,76,087
Recovered:
56,08,753
Deaths:
1,03,748
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,122
660
Maharashtra
1,60,693
12,207

इंडिगोच्या विमानात बाॅम्ब ठेवल्याची अफवा, २ तास उशीराने विमान दिल्लीकडे झेपावलं

बाॅम्बच्या धमकीनंतर तपास यंत्रणांनी डाॅग स्क्वाॅडसोबत संपूर्ण विमानाची तपासणी केली. या महिलेने विमानतळावर संशयास्पदरितीने फिरणाऱ्या काही लोकांचे फोटोही तपास यंत्रणांना दाखवले. परंतु त्यातून काहीही निष्पण्ण न झाल्याने अखेर २ तास २५ मिनिटे उशीराने म्हणजेच ८.४० मिनिटांनी या विमानाला उड्डाण करण्यास परवानगी देण्यात आली.

इंडिगोच्या विमानात बाॅम्ब ठेवल्याची अफवा, २ तास उशीराने विमान दिल्लीकडे झेपावलं
SHARES

मुंबईहून व्हाया दिल्ली लखनऊला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात बाॅम्ब ठेवल्याची धमकी देणारा निनावी फोन आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या विमानाचं उड्डाण रद्द करण्यात आलं. धमकीच्या फोननंतर सुरक्षा यंत्रणांनी मुंबई विमानतळावरच विमानाची तपासणी सुरू केली केली. परंतु त्यात काहीही आढळून न आल्याने विमानाला उड्डाणास परवानगी देण्यात आली. त्यानंतर तब्बल २ तासांच्या फरकाने हे विमान दिल्लीकडे झेपावलं. तोपर्यंत विमानातील प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. असं असलं तरी ही धमकी गांभीर्याने घेत विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थाही सतर्क ठेवण्यात आली आहे.


कधी आला फोन?

हे विमान मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ वरून सकाळी ६ वाजून ०५ मिनिटांनी दिल्लीकडे झेपावणार होतं. परंतु विमानतळावरील इंडिगोच्या चेक इन काऊंटवर एका महिला प्रवाशाने आपल्याला एक निनावी फोन आला असून या फोनद्वारे फ्लाइट 6E 3612 मध्ये बाॅम्ब असल्याचं सांगण्यात आलं आहे, अशी माहिती दिली.


महिलेला फोन

त्यानंतर विमानतळावर एकच खळबळ उडाली. तपास यंत्रणांनी डाॅग स्क्वाॅडसोबत संपूर्ण विमानाची तपासणी केली. या महिलेने विमानतळावर संशयास्पदरितीने फिरणाऱ्या काही लोकांचे फोटोही तपास यंत्रणांना दाखवले. परंतु त्यातून काहीही निष्पण्ण न झाल्याने अखेर २ तास २५ मिनिटे उशीराने म्हणजेच ८.४० मिनिटांनी या विमानाला उड्डाण करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानुसार हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सकाळी १०.४५ वाजता पोहोचलं.


धमकीत वेगळेपणा

सद्यस्थितीत विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून सीआयएसएफचे अधिकारी या महिलेची अधिक चौकशी करत आहेत. एवढंच नाही, तर सीआयएसएफचे सहायक कमांडर यांनी आपल्या कार्यालयात बीटीएसीची बैठक बोलावली आहे. देण्यात आलेली निनावी धमकीत वेगळेपण असल्याचा सुरक्षा यंत्रणांचा होरा आहे.हेही वाचा-

धुक्याने अडवली लोकलची वाट, मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल

'एमएमआरडीए'ने घेतला मोनोरेलचा ताबा, स्कोमी, एल अँड टीची हाकालपट्टीसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा