दबंग 'लांडें'च्या कारवाईचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला धसका

बारमध्ये महिलांकडून अश्लील चाळे केले जात असल्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांनी सायंकाळी ७ ते १:३० वा. पर्यंत बारमध्ये एका अधिकारी आणि शिपायाची नियुक्ती केली आहे.

दबंग 'लांडें'च्या कारवाईचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला धसका
SHARES
 मुंबईत मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या बार अँण्ड रेस्टाॅरंटवर पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी कारवाईचा धडाका सुरु केल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या झोपा उडाल्या आहेत. गावदेवी येथील बारमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर लांडे यांनी कारवाई केली. या प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर पोलिस आयुक्तांनी थेट निलंबनाची कारवाई केली होती. या कारवाईनंतर मुंबईतील सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी लांडेच्या कारवाईचा धसका घेतल्याचं बोललं जातं.


कारवाईची माहिती आधीच 

मुंबईच्या ओशिवरा परिसरातील मेट्रो बारमध्ये महिला ग्राहकांशी अश्लील कृत्य करत असल्याची माहिती लांडे यांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री लांडे यांनी त्यांच्या पथकाच्या मदतीने कारवाई केली. मात्र कारवाईत त्यांच्या पथकाच्या हाती फक्त ८ बारबालाच हाती लागल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लांडेंच्या कारवाईची माहिती आधीच बारवाल्यांपर्यंत पोचल्याने पोलिस येण्यापूर्वीच बारबाला आहे त्या वेशात पळून गेल्या. विशेष म्हणजे या बारचा परवानाच संपला असून परवान्याचेनुतनीकरण केले नसल्याचे चौकशीत पुढे आले आहे.


धारावीत कारवाई 

 सोमवारी पहाटे लांडेे यांच्या पथकाने  धारावीतील 'डिस्कव्हरी बार अँण्ड रेस्टाँरंट'वर कारवाई केली. या कारवाईत ८ बारबालासह, १९ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत बारमध्ये महिला ग्राहकांशी अश्लील कृत्य करताना आढळून आल्या होत्या. या प्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात २९४ ११४ आणि ३४ भा.द.वि कलमांसह गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


पोलिसांच निलंबन 

बारमध्ये महिलांकडून अश्लील चाळे केले जात असल्यामुळे हे प्रकार रोखण्यासाठी स्थानिक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठांनी सायंकाळी ७ ते १:३० वा. पर्यंत बारमध्ये एका अधिकारी आणि शिपायाची नियुक्ती केली आहे. मात्र बारमध्ये नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधीत बारवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. मात्र तरीही पोलिसांसमोर  नियमांचे उल्लघंन सुरू असल्याचे अनेक कारवाईतून पुढे आले आहे. आतापर्यंत चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा ही समावेश आहे.


विनापरवाना पब

एका आरटीआय कार्यकर्त्याने माहिती अधिकाराखाली मागवलेल्या माहितीत मुंबई पोलिसांनी फक्त ४६ पबला परवानगी दिली असल्याचे समोर आले आहे. मात्र,  प्रत्यक्षात २०० हून अधिक पब बिनदिक्कत सुरू असल्याचे दिसून येत आहे. हेही वाचा - 

स्किमरच्या माध्यमातून पैसे चोरणारा नायझेरियन अटकेत

सायबर चोरट्यांनी लोकलच्या मोटरमनला दहा लाखाला गंडवलं
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा