स्किमरच्या माध्यमातून पैसे चोरणारा नायझेरियन अटकेत

एटीएममध्ये पुन्हा आरोपी पैसे काढण्यासाठी येईल म्हणून पोलिसांनी एटीएमबाहेर सुरक्षा रक्षकांच्या वेशात पोलिस लक्ष ठेवून होते. यावेळी ईसाही ओगुन्ले सेयी हा नायझेरियन त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी आला.

स्किमरच्या माध्यमातून पैसे चोरणारा नायझेरियन अटकेत
SHARES
मुंबईतल्या सुरक्षा रक्षक नसलेल्या एटीएममध्ये स्किमर लावून नागरिकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरून पैसे चोरणाऱ्या नायझेरियन टोळीचा समतानगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ईसाही ओगुन्ले सेयी (३४) असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांंना अखेर एटीएमच्या सुरक्षा रक्षकाचा पेहराव करावा लागला.


पाठलाग करून पकडले

मालाडच्या कुरार गाव परिसरात राहणाऱ्या हर्शद चावडा (२२) यांनी पश्चिम उपनगरातील एटीएममधून काढले. त्या एटीएममध्ये पुन्हा आरोपी पैसे काढण्यासाठी येईल म्हणून पोलिसांनी एटीएमबाहेर सुरक्षा रक्षकांच्या वेशात पोलिस लक्ष ठेवून होते. यावेळी ईसाही ओगुन्ले सेयी  हा नायझेरियन त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी आला. त्यावेळी त्याला सुरक्षा रक्षकाच्या हालचालीवर संशय आल्यानेे पैसे न काढताच तो एटीएमबाहेर आला. त्याच्या संशयास्पद हालचालीमुळे पोलिसांचे लक्ष त्याच्यावर एकवटले. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता तो पळू लागला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला पाठलाग करून पकडले.


मैत्रिणीच्या मदतीने फसवणूक

  
त्याच्या चौकशीत त्याने ही फसवणूक त्याची नायझेरियन मैत्रीण खरड रोझी माँगी हिच्या मदतीने केल्याची कबूली दिली आहे. या प्रकरणी समतानगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून ईसाही ओगुन्ले सेयीला अटक केली आहे. त्याच्याजवळून दोन मोबाइल, ३ बनावट डेबिट कार्ड, स्किमर मशीन, मायक्रो कॅमेरा जप्त केला आहे. 
हेही वाचा -

बोगस पत्रकार आणि पोलिसाला पायधुनी पोलिसांनी केली अटक

धावत्या लोकलमध्ये चढणं पडलं महागात, दैव बलवत्तर म्हणून वृद्ध थोडक्यात बचावला
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा