धावत्या लोकलमध्ये चढणं पडलं महागात, दैव बलवत्तर म्हणून वृद्ध थोडक्यात बचावला

लोकलमध्ये या वृद्ध व्यक्तीने सामान ठेवले. त्यानंतर चालत्या लोकलमघ्ये त्याने चढण्याचा प्रयत्न केली. त्यावेळी त्या वृद्धाचा तोल गेल्याने त्याला रेल्वेत चढता आले नाही.

धावत्या लोकलमध्ये चढणं पडलं महागात, दैव बलवत्तर म्हणून वृद्ध थोडक्यात बचावला
SHARES
धावत्या लोकल ट्रेनमध्ये चढणं जीवघेणं ठरू शकतं, अशी रेल्वे प्रशासनानं वारंवार सूचना करूनही 'या' सारख्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. नुकतेच कुर्ला स्थानकाजवळ डोक्यावर सामान घेऊन लोकल पकडणं एका व्यक्तीला चांगलंच महागात पडलं आहे. दैव बलवत्तर म्हणून तो या अपघातात थोडक्यात बचावला. दरम्यान, हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.


थोडक्यात बचावला

कुर्ला स्थानकावर एक व्यक्ती सामान घेऊन कल्याणला जाण्याकरीता लोकल पकडण्यासाठी फलाटवरून चालत होता. त्याच वेळी कल्याणला जाणारी १२:५२ ची लोकल सुरू झाली. त्यावेळी लोकलमध्ये या व्यक्तीनं सामान ठेवलं. तितक्यात लोकल सुरू झाली आणि त्यान चालत्या लोकलमध्ये  चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या व्यक्तीचा तोल गेल्यानं त्याला लोकलमध्ये चढता आलं नाही. त्यामुळं लोकलनं त्यांना काही अंतरावर फरफटत नेलं. या दुर्घटनेनंतर लोकलमधील प्रवाशांनी चेन पुलिंग करत लोकल थांबवत त्या व्यक्तीला वाचवलं.



कोणत्याही प्रकारची जखम नाही

दरम्यान, दैव बलवत्तर म्हणून हा वृद्ध वाचला, त्याच्या अंगाला कोणत्याही प्रकारची जखम झालेली नाही. या दुर्घटनेनंतर कुर्लाच्या आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरेश अत्री यांनी या व्यक्तीला समज दिली.



हेही वाचा -

८५ टक्के रिक्षाचालक करतात तंबाखूचे सेवन

जीएसटी अधीक्षकाची वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा