Advertisement

८५ टक्के रिक्षाचालक करतात तंबाखूचे सेवन

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनद्वारे (सीपीएए) मागील ५ महिन्यांमध्ये रिक्षा चालकांच्या तंबाखू सेवनाबाबत सर्वेक्षण करण्यात आलं होतं. या तपासणी शिबिरादरम्यान तब्बल ८५ टक्के चालक हे तंबाखू सेवन करत असल्याचं आढळून आलं आहे.

८५ टक्के रिक्षाचालक करतात तंबाखूचे सेवन
SHARES

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनद्वारे (सीपीएए) मागील ५ महिन्यांमध्ये शहर उपनगरांतील अनेक परिसरामधील रिक्षा चालकांच्या तंबाखू सेवनाबाबत सर्वेक्षण करण्यात आलं होतं. जवळपास तीन हजार रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिरादरम्यान तब्बल ८५ टक्के चालक हे तंबाखू सेवन करत असल्याचं आढळून आलं असून, त्यातील ४५ टक्के रिक्षाचालकांमध्ये कर्करोगसदृश लक्षणं आढळून आल्याचं धक्कादायक सर्वेक्षण समोर आले आहे. त्याचप्रमाणं यामध्ये प्लाकिया, सब म्युकस फायब्रॉसीस, बायोप्सी, एफएनएसी या रोगांचा समावेश आहे.


तपासणी शिबिरांचं आयोजन

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनद्वारे शहर उपनगरांतील अनेक परिसरांत तपासणी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये कुर्ला, सांताक्रुझ, बोरीवली, गोरेगाव आणि मालाड अशा विविध परिसरांचा समावेश आहे. या शिबिरांमध्ये कान, नाक, घसा आणि दातांचे डॉक्टर सहभागी झाले होते. त्यावेळी रिक्षाचालकांना तंबाखू सेवनाची सवय लागते, ती अनेक कारणांमुळं लागल्याचं आढळून आलं. व्यावसायिक ताणतणाव, भूक मारली जाणं, व्यसनं, प्रदूषणाचा त्रास आणि आपल्या कुटुंबापासून आलेले दुरावलेपण या कारणांमुळं तंबाखू सेवनाची सवय रिक्षाचालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याचं निरीक्षण सर्वेक्षणाअंती नोंदविण्यात आलं आहे.

त्याशिवाय, या सर्वेक्षणामध्ये तंबाखू सेवनाची कारणं, कर्करोग होण्याचं प्रमाण आणि कर्करोगाची लक्षणं यामध्ये सामायिक दुवा आढळून आला आहे. दरम्यान, ज्या रिक्षाचालकांच्या तोंडामध्ये तंबाखू सेवनामुळं डाग दिसू लागले आहेत, त्यांना सीपीएएच्या रोग निदान केंद्रांमध्ये नियमितपणं बोलावून जी तपासणी करणं गरजेचं असेल ती संस्थेमार्फत विनामूल्य करण्यात येणार आहे.



हेही वाचा -

दुष्काळासाठी राज्य सरकारनं काय कामं केली? - राज ठाकरे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा