COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,08,992
Recovered:
56,39,271
Deaths:
1,11,104
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
15,773
700
Maharashtra
1,55,588
10,442

जीएसटी अधीक्षकाची वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

मुंबईतील कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतीच्या ३०व्या मजल्यावरून उडी मारून जीएसटी अधीक्षकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

जीएसटी अधीक्षकाची वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या
SHARES

मुंबईतील कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर इमारतीच्या ३०व्या मजल्यावरून उडी मारून जीएसटी अधीक्षकानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हरेंद्र कपाडिया (५१) असं जीएसटी अधीक्षकाचं नाव आहे. सोमवारी ६.३० वाजताच्या सुमारास जीएसटी अधिकारी हरेंद्र यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळते.


आजाराला कंटाळून आत्महत्या

हरेंद्र कपाडिया यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ब्रेन स्ट्रोकमुळं मागील ८ ते १० महिन्यांपासून हरेंद्र कामाला गेले नव्हते. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचं समजतं आहे. दरम्यान, हरेंद्र यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीच्या ३०व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर तेथील नागरिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं.

अपघाती मृत्यूची नोंद

याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता, हरेंद्र यांनी आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आलं आहे. तसंच, याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील चौकशी करण्यात येत आहे.हेही वाचा -

८५ टक्के रिक्षाचालक करतात तंबाखूचे सेवन

एमयूटीपी-३साठी कर्ज देण्यास जागतिक बॅंकेचा नकारRead this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा