Advertisement

एमयूटीपी-३साठी कर्ज देण्यास जागतिक बॅंकेचा नकार

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-३साठी (एमयूटीपी-३) जागतिक बॅंकेकडून कर्ज मिळणार होतं. परंतु, आता जागतिक बॅंकेनं कर्ज देण्यास नकार दिला आहे.

एमयूटीपी-३साठी कर्ज देण्यास जागतिक बॅंकेचा नकार
SHARES

रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-३साठी (एमयूटीपी-) जागतिक बॅंकेकडून कर्ज मिळणार होतं. परंतु, आता जागतिक बॅंकेनं कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळं ३०० वाढीव लोकल फेऱ्यासह एमयूटीपी-३मधील पनवेल-कर्जत उपनगरीय मार्ग, विरार-डहाणू चौपदरीकरण, ऐरोली-कळवा उपनगरीय मार्ग रखडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


कामाबाबत नापंसती

'मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एमआरव्हीसी) १०,९४७ कोटी रुपयांच्या एमयूटीपी-३ प्रकल्पाला ३० डिसेंबर २०१६ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होती. यांपैकी ६१२९ कोटी रुपये कर्जाच्या स्वरूपात व ८१८ कोटी रुपये राज्य आणि केंद्रानं ५०:५० टक्के याप्रमाणं उभारण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. या प्रकल्पांसाठी जागतिक बँकेकडून तब्बल सहा हजार कोटी रुपये कर्जाची मागणी करण्यात आली होती. मात्र जागतिक बँकेनं निधी देण्यास नकार दिला आहे. एमयूटीपी-२साठी जागतिक बँकेनं 'एमआरव्हीसी'ला १७२७ कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. कर्ज घेतलेले प्रकल्प पूर्ण झाले, मात्र जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी कामाबाबत नापंसती दर्शवली आहे. त्यामुळं नव्याने कर्ज देण्यास जागतिक बॅंक इच्छुक नसल्याची माहिती मिळते आहे.


बँकेशी चर्चा सुरू

दरम्यान, जागतिक बँकेने निधी देण्यास नकार दिला असली तरी, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक, एशियन डेव्हलपमेंट बँकेशी चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

'एमयूटीपी-'चे प्रकल्प

  • पनवेल-कर्जत उपनगरीय मार्ग (२८ किमी) - २७८२
  • ऐरोली-कळवा उन्नत मार्ग (४ किमी) - ४७६
  • विरार-डहाणू रोड चौपदरीकरण (६४ किमी) - ३५७८
  • वातानुकूलित लोकल (५६५ डबे) - ३४९१
  • रुळ ओलांडणी नियंत्रण (मध्य रेल्वे-१८ ठिकाणे, पश्चिम रेल्वे ४ ठिकाणे) - ५५१
  • तांत्रिक मदत - ६९
  • एकूण - १०,९४७हेही वाचा -

८५ टक्के रिक्षाचालक करतात तंबाखूचे सेवनRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा