बोगस पत्रकार आणि पोलिसाला पायधुनी पोलिसांनी केली अटक

'तुम्ही डुबलीकेट परफ्युम बनवत असल्याची माहिती मिळाली असल्याचे सांगत' दुकानाचे फोटो काढू लागले. पांडे यांना घाबरवण्यासाठी एकाने त्याचे ओळखपत्र ही दाखवले.

बोगस पत्रकार आणि पोलिसाला पायधुनी पोलिसांनी केली अटक
SHARES

पायधुनी परिसरातील अत्तराच्या दुकान मालकाला पोलीस आणि पत्रकार असल्याचं भासवत आणि त्याला कारवाईची भिती घालणाऱ्या २ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. फ्रान्सिस ऑगस्टीन डिसूजा आणि गौरव मोरे अशी या दोघांची नावं आहेत. या दोघांच्या इतर ३ साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.


डुबलीकेट परफ्युमची माहिती

मस्जिद बंदर येथील सॅम्युअल स्ट्रीट येथे शरद पांडे यांचं अत्तराचं दुकान आहे. शनिवारी संध्याकाळी पांडे हे नेहमीप्रमाणं त्याच्या दुकानात बसले होते. त्यावेळी त्यांच्या दुकानात पाचजण आले. त्या ५ जणांमधील ३ जणांनी आपली ओळख पोलिस तर दोघांनी पत्रकार असल्याचं सांगितलं. या ५ जणांनी पांडे यांच्याकडं 'तुम्ही डुबलीकेट परफ्युम बनवत असल्याची माहिती मिळाली असल्याचं सांगत' दुकानाचे फोटो काढू लागले. पांडे यांना घाबरवण्यासाठी एकानं त्याचं ओळखपत्र ही दाखवलं. दुकानात गोंधळ सुरू असल्याचं पाहून दुकानाबाहेर गर्दी जमू लागली. हे पाहून त्या ५ जणांपैकी तिघांनी दुकानातून काढता पाय घेतला. त्यावेळी दुकानदाराला फ्रान्सिस ऑगस्टीन डिसूजा आणि गौरव मोरे याच्यावर संशय आल्यानं त्यानं थेट पोलिस नियंत्रण कक्षाला बोलवून दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं.


पोलिस कोठडी

डिसूजा हा मानखुर्द परिसरात राहणारा असून तो एका वृत्तपत्राचा वार्ताहर असल्याचं त्यानं सांगितलं. तर गौरव मोरे हा छोटी मोठी कामं करून स्वतःचा उदरनिर्वाह करत असल्याचं त्यानं सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी ५ ही जणांवर पायधुनी पोलिस ठाण्यात गोरख क्रमांक ९४, १९ कलम १७०,४१९,४२०,५११,४५२,३४ भादवी प्रमाणं गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोघांना न्यायालयानं पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा -

जेट एअरवेजच्या सीएफओ यांचा राजीनामा

'बेस्ट बस भाड्याने घेणं म्हणजे बेस्टचं खासगीकरण नाही' - पालिका आयुक्त



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा