Advertisement

जेट एअरवेजच्या सीएफओ यांचा राजीनामा

जेटचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) अमित अग्रवाल यांनी मंगळवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

जेट एअरवेजच्या सीएफओ यांचा राजीनामा
SHARES

आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेज कंपनीचे संचालक गौरंग शेट्टी, स्वतंत्र संचालक राजश्री पाथी आणि कार्यकारी संचालक आणि कार्यकारी संचालक नसीम जैदी यांनी पदांचा राजीनामा दिला होता. अशातच आता जेटचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) अमित अग्रवाल यांनी मंगळवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.


व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा

अमित अग्रवाल यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, याआधी जेटच्या ३ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. त्यावेळी सुद्धा त्यांनी व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा देत असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळं जेट एअरवेज कंपनीला हा चौथा झटका बसला आहे. डिसेंबर २०१५ मध्ये अमित अग्रवाल यांनी जेट एयरवेज कंपनीत कार्यरत झाले होते.हेही वाचा -

जीएसटी अधीक्षकाची वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

'बेस्ट बस भाड्याने घेणं म्हणजे बेस्टचं खासगीकरण नाही' - पालिका आयुक्तसंबंधित विषय