लाठीचा वापर करण्याची वेळ आमच्यावर आणू नका - पोलीस महासंचालक

राज्यात बुधवारी रात्रीपासून ८ वाजल्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना आवाहन केलं.

लाठीचा वापर करण्याची वेळ आमच्यावर आणू नका - पोलीस महासंचालक
SHARES

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जनतेने सहकार्य करावं. आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची हमी देतो, पण जाणूबुजून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका, असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केलं.

राज्यात बुधवारी रात्रीपासून ८ वाजल्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन नागरिकांना आवाहन केलं. राज्यात १४४ कलम लागू होत आहे. त्यामुळे ५ पेक्षा जास्त लोकांनी घराबाहेर पडू नये. जर खरोखर काम असेल आणि कोणी बाहेर पडलं असेल तर हरकत नाही. जाणूनबुजून नियमभंग केला नसेल तर विनाकारण फटकवू नका. मात्र, जाणूनबुजून नियमांचा भंग करून आमच्यावर लाठी वापरण्याची वेळ आणून नका, असं पांडे म्हणाले.

सर्वांनी नियम पाळा. पोलीस आपल्यासोबत उभे आहेतच. सरकारच्या आदेशाचं पालन करा. मोठ्या देशांनी लॉकडाऊन केलंय. आपल्याला ते नवं नाही. आपणही नियमांचं काटेकोर पालन केलं तर येत्या १५ दिवसात कोरोनाचे आकडे कमी होतील, असा दावाही त्यांनी केला.

पोलिसांकडे पॉवर आहेत. आम्ही त्याचा कमीत कमी त्याचा वापर करू. मात्र लोकांनी सहकार्य केलं नाही तर कारवाई निश्चित होणार, त्यात वाद नाही. आम्हाला कारवाई करायची नाहीय. विनाकारण कारवाई करायची नाही याची हमी देतो. पण तुम्हीही कायद्याचा आदर करा. सहकार्य करा, असं आवाहनही त्यांनी केलं. अत्यावश्यक काम असेल तर पासशिवाय तुम्ही बाहेर पडू शकता. पण कारण नसताना बाहेर पडल्यास कारवाई होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.



हेही वाचा - 

सचिन वाझे आणखी दोघांची हत्या करणार होते, तपास यंत्रणांना संशय

पाण्याचा वापर जपून करा; मुंबईला ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा