COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

सचिन वाझे आणखी दोघांची हत्या करणार होते, तपास यंत्रणांना संशय

तपास अधिकाऱ्यांना वाझे यांच्या ठाणे येथील घरातून एका अज्ञात व्यक्तीचा पासपोर्ट सापडला आहे. हा पासपोर्ट सर्वात मोठा पुरावा ठरू शकतो.

सचिन वाझे आणखी दोघांची हत्या करणार होते, तपास यंत्रणांना संशय
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहनप्रकरणी तपास करताना एनआयएन नवनवीन माहिती मिळत आहे. याप्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे हे आणखी दोघांची हत्या करणार असल्याचा मोठा खुलासा एनआयएने दिला आहे. 

५  मार्च रोजी मनसुख हिरेन याची हत्या करण्यामागे अशा प्रकारची योजना असावी असा तपास यत्रणाना संशय आहे. या बाबत हिरेन यांचा बनावट चकमकीत मृत्यू झाल्याचा देखावा केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील सचिन वाझे यांचा हात वेळीच लक्षात आल्याने दोन हत्या वाचल्या आहेत.

तपास अधिकाऱ्यांना वाझे यांच्या ठाणे येथील घरातून एका अज्ञात व्यक्तीचा पासपोर्ट सापडला आहे. हा पासपोर्ट सर्वात मोठा पुरावा ठरू शकतो. हा पासपोर्ट ज्या व्यक्तीचा आहे त्याची आणि आणखी एकाला स्फोटक प्रकरणात गुंतवण्यात येणार होतं. त्यानंतर त्यांची हत्या करून स्फोटक प्रकरणाचा छडा लावल्याचं श्रेय सचिन वाझे यांना घ्यायचं होतं, असं एनआयएच्या तपासात उघड झालं आहे.

२५ फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली  स्कॉर्पिओ  सापडली होती.  सुरुवातीला औरंगाबादल येथील मारुती इको कारमध्ये ही स्फोटकं ठेवण्याचा प्लान ठरला होता. मात्र, हा प्लान फसला. मात्र या गाडीची नंबर प्लेट एनआयएला मीठी नदीत सापडली आहेत. हेही वाचा - 

पाण्याचा वापर जपून करा; मुंबईला ७ ऑगस्टपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक

१५ दिवसांच्या संचारबंदीत काय सुरू, काय बंद? वाचा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा