घाटकोपर विमान दुर्घटना- कंपनीचं लायसन्स रद्द

अपघातानंतर २ जुलैला 'डीजीसीए'ने या कंपनीचं आॅडिट करण्याचे निर्देश दिले होते. या विमानात अनेक तांत्रिक दुरूस्त्या करण्यात येऊनही कंपनीकडून त्यांचं रेकाॅर्ड ठेवण्यात येत नव्हतं, असं तपासात समोर आलं आहे, त्यानंतर हे निर्देश देण्यात आले.

घाटकोपर विमान दुर्घटना- कंपनीचं लायसन्स रद्द
SHARES

घाटकोपरमध्ये जून महिन्यात झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास अहवाल नुकसाच नागरी विमानवाहतूक महासंचालनालया (डीजीसीए) ला सुपूर्द करण्यात आला. या अहवालानंतर 'डीजीसीए'ने विमान दुरूस्ती करणारी कंपनी इंडेमर एव्हिएशन प्रा. लि. या कंपनीचं लायसन्स रद्द केलं आहे. यामुळे आता या कंपनीला कुठल्याही विमानाच्या देखभाल-दुरूस्तीचं काम करता येणार आहे.

कधी घडली हाेती दुर्घटना?

घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात २८ जून २०१८ ला चार्टर्ड विमान कोसळून एका पादचाऱ्यासह विमानातील ४ जणांचा मृत्यू झाला होता, तर दोन जण जखमी झाले होते. उत्तर प्रदेश सरकारने २०१४ मध्ये हे विमान यू वाय अॅव्हिएशन या कंपनीला विकलं होतं. त्यानंतर कंपनीने या विमानाची दुरूस्ती करून विमानाला पुन्हा सेवेत आणलं होतं.

आॅडिटनंतर निर्देश

अपघातानंतर २ जुलैला 'डीजीसीए'ने या कंपनीचं आॅडिट करण्याचे निर्देश दिले होते. या विमानात अनेक तांत्रिक दुरूस्त्या करण्यात येऊनही कंपनीकडून त्यांचं रेकाॅर्ड ठेवण्यात येत नव्हतं, असं तपासात समोर आलं आहे, त्यानंतर हे निर्देश देण्यात आले.

आघाडीची कंपनी

जुहू विमानतळावर कार्यरत असलेली इंडेमर एव्हिएशन प्रा. लि. ही विमान दुरूस्ती कंपनी भारतीय नागरी विमान दुरूस्ती क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी आहे. 'डीजीसीए'च्या निर्देशामुळे या कंपनीला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा-

त्या' विमानाचे मालक दीपक कोठारींवर गुन्हे दाखल करा- विखे पाटील

म्हणून 'त्या' विमानकंपनीला काळ्या यादीत टाकलं

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा