Advertisement

त्या' विमानाचे मालक दीपक कोठारींवर गुन्हे दाखल करा- विखे पाटील


त्या' विमानाचे मालक दीपक कोठारींवर गुन्हे दाखल करा- विखे पाटील
SHARES

घाटकोपर विमान अपघातप्रकरणी यू. वाय. एव्हिएशनचे संचालक दीपक कोठारी यांच्याविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली अाहे.


काय म्हटलंय पत्रात?

अपघाताच्या दिवशी हवामान अतिश प्रतिकूल होते. तरीही 'टेस्ट फ्लाईट' करणं अत्यंत जोखमीचं होतं. अशा परिस्थितीतही विमानानं उड्डाण का केलं, याची चौकशी व्हायला हवी. या अपघातात मृत पावलेल्या सहवैमानिक कॅप्टन मारिया झुबेरी यांचे पती प्रभात कठुरिया यांचे अपघातापूर्वी कॅप्टन प्रदीप राजपूत अाणि मारिया या दोघांशीही दूरध्वनीवरून संभाषण झालं होतं. प्रतिकूल हवामानामुळे उड्डाण शक्य नसल्याचं दोघांचं मत होतं. मात्र यू. वाय. एव्हिएशनने 'टेस्ट फ्लाईट'साठी दबाव अाणला होता.


कंपनीचा रेकाॅर्ड खराब

यू वाय एव्हिएशनचा 'सेफ्टी रेकॉर्ड' अत्यंत खराब आहे. या कंपनीच्या हेलिकॉप्टर्सची योग्य देखभाल केली जात नाही. त्यामुळे यापूर्वीही अपघाताची परिस्थिती निर्माण होऊन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींबाबत इतकी हलगर्जी केली जात असेल तर इतरांबाबत किती बेफिकिरीची मानसिकता या कंपनीकडून अवलंबली जात असावी, असा संशय घेण्यास पूर्ण वाव असल्याचे नमूद करून विरोधी पक्षनेत्यांनी संचालक दीपक कोठारी यांच्याविरूद्ध कारवाईची मागणी केली आहे.


केंद्राकडे पाठपुरावा करणार

'डीजीसीए'ने हे विमान 'टेस्ट फ्लाईट'साठी सक्षम असल्याचं प्रमाणित केलं होतं. परंतु, 'टेस्ट फ्लाईट'दरम्यान हा अपघात झाल्यानं 'डीजीसीए'नं विमानाला चाचणी उड्डाणासाठी परवानगी देताना पुरेशी दक्षता घेतली नसावी, असं दिसून येतं. त्यामुळे सदरहू विमानाला उड्डाणास सक्षम असल्याचं प्रमाणित करणाऱ्या डीजीसीएच्या अधिकाऱ्यांना तातडीनं निलंबित करण्यासंदर्भात आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.


हेही वाचा -

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून ५ जणांचा मृत्यू

'ब्लॅक बॉक्स' म्हणजे काय रं भाऊ ?

घाटकोपर विमान दुर्घटना: नुकसान भरपाईशिवाय मृतदेह हाती घेणार नाही, मृत पादचाऱ्याचा भावाचा आक्रोश



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा