Advertisement

घाटकोपर विमान दुर्घटना: नुकसान भरपाईशिवाय मृतदेह हाती घेणार नाही, मृत पादचाऱ्याचा भावाचा आक्रोश

घाटकोपर विमान दुर्घटनेत मृत्यू झालेला पादचारी गोविंद दुबे याच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

घाटकोपर विमान दुर्घटना: नुकसान भरपाईशिवाय मृतदेह हाती घेणार नाही, मृत पादचाऱ्याचा भावाचा आक्रोश
SHARES

घाटकोपर चार्टर्ड प्लेन दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पाचही जणांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह गुरूवारी शवविच्छेदनासाठी राजावडी रुग्णालयात नेण्यात आले होते. हे मृतदेह शुक्रवारी संबंधितांच्या नातेवाईकांना सुपूर्द करण्यात येत असताना या दुर्घटनेत मृत्यू झालेला पादचारी गोविंद दुबे याच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात गुरूवारी २८ जूनला दुपारी सुमारे १.३० च्या सुमारास चार्टर्ड विमान कोसळलं हाेतं. या विमान दुर्घटनेत गोविंद दुबे या पादचाऱ्यासह विमानातील ४ जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.




असं गाठलं मृत्यूने

गोविंद दुबे हा कारपेंटर कारागीर असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील जौनपूरचा रहिवासी आहे. त्याचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होते, अशी माहिती त्याचा भाऊ गोपाल दुबे यांनी दिली. गोविंद गुरूवारी जीवदया लेनमधील एका घराच्या दरवाजे आणि खिडक्यांचं माप घेऊन निघाला आणि त्याला मृत्यूनं गाठलं.

माझ्या भावाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला, तरी आमच्यापर्यंत अद्याप सरकारचा कुठलाही अधिकारी किंवा यू. वाय. एव्हिएशन विमान कंपनीचा कोणताही प्रतिनिधी आलेला नाही. आम्ही गरीब घरातील असल्यानंच माझ्या भावाच्या मृत्यूची दखल घेतली नाही का? आम्हाला जोपर्यंत मदत मिळत नाही, तोपर्यंत आम्ही भावाचा मृतदेह स्वीकारणार नाही.
- गोपाल दुबे, गोविंद याचा भाऊ



हेही वाचा -

बोरीवलीत मधमाशांनी घेतला एकाचा जीव

'कॉल सेंटरपेक्षा अॅप सुरू करा'


 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा