Advertisement

'कॉल सेंटरपेक्षा अॅप सुरू करा'

बेस्टकडून वीज घेणाऱ्या ग्राहकांना तक्रार करता यावी, म्हणून कॉल सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र गुरुवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव फेटाळून लावत यापेक्षा अॅप सुरू केल्यास ग्राहकांना जास्त सोयीचं ठरेल, असं मत बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी व्यक्त केलं.

'कॉल सेंटरपेक्षा अॅप सुरू करा'
SHARES

बेस्टकडून वीज घेणाऱ्या ग्राहकांची संख्या 10 लाख एवढी आहे. मात्र या ग्राहकांची तक्रार नोंदवून घेण्यासाठी बेस्टकडे पुरेशी सुविधाच नाही. त्यामुळे बेस्टकडून वीज घेणाऱ्या ग्राहकांना तक्रार करण्यासाठी आणलेल्या कॉल सेंटरच्या प्रस्तावाबाबत गुरुवारी बेस्ट समितीच्या बैठकीत सदस्यांनी आक्षेप नोंदवत हा प्रस्ताव फेटाळून लावला. 

या कॉल सेंटरसाठी 2 कोटी खर्च लागणार होता. त्यामुळे कॉल सेंटरसाठी इतका खर्च करण्यापेक्षा अॅप सुरू केल्यास ग्राहकांना जास्त सोयीचं ठरेल, असं मत बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी व्यक्त केलं.


म्हणून हा प्रस्ताव रद्द

वीज ग्राहकांकडून तक्रार नोंदवून घेण्यासाठी बेस्टकडे पुरेशी सुविधा नसल्याने बेस्ट समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र या कॉल सेंटरसाठी 2 कोटी खर्च येणार असल्याचा आक्षेप घेत बेस्ट समितीतील सदस्यांनी साई फ्युचर इंडिया या कंपनीचा प्रस्ताव रद्द केला.


यापेक्षा अॅप सोयीचं

कॉल सेंटरची पद्धत जुनी झाली असून आता ग्राहकांचा जमाना आहे. आपण ग्राहकांकडे जायला हवं. ग्राहकांच्या तक्रारी समजून घ्यायला हव्या त्यासाठी कॉल सेंटर सुरू करण्यापेक्षा एखादं चांगलं अॅप सुरू केल्यास ते जास्त सोयीचं होईल असं, बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी सुचवलं.

सुरुवातीला पाच आणि नंतर दोन अशा सात वर्षांच्या मुदतीचा हा प्रस्ताव होता. पण फक्त फोन करण्यासाठी 2 कोटी खर्च करणे फायद्याचं नसल्याचं म्हणत समिती सदस्यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला.


हेही वाचा - 

बेस्टला 117 कोटींचं नुकसान, 6 लाख प्रवासी घटले!

पावसाळ्यात बत्तीगुल झाल्यास चिंता नको!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा