Advertisement

बेस्टला 117 कोटींचं नुकसान, 6 लाख प्रवासी घटले!


बेस्टला 117 कोटींचं नुकसान, 6 लाख प्रवासी घटले!
SHARES

बेस्टची आर्थिक स्थिती आधीच डबघाईला आलेली असताना आता बेस्टला 112 कोटींचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरात बेस्टमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं प्रमाण 6 लाखांनी घटल्याने बेस्टला हा फटका बसल्याचं बेस्ट समिती सदस्य सुनील गणाचार्य यांनी सांगितलं.


यामुळेही नुकसान

बेस्टचा रोजचा प्रवास 180 कीमी वरून 170 किमीवर आला आहे. सोबतच बंद पडणाऱ्या बस, खराब झालेल्या तिकीट मशीन, मेट्रो, शेअर रिक्षा यामुळेही बेस्टच्या प्रवासी संख्येत घट झाल्याचं बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी सांगितलं.

सध्या बेस्टकडे 3 हजार 300 गाड्या असून त्यापैकी केवळ 2 हजार 900 गाड्या रस्त्यावर धावतात. त्यामुळे बेस्टचं महसूल वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आलं. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती कारण्यावरसुद्धा भर देणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा