अॅण्टॉप हिल हत्येप्रकरणी आरोपीला अटक

पुण्यावरून आनंद यांचा व्यावसायिक भागिदार सारंग हरीष पाटणकरला ताब्यात घेतली आहे. आनंद पूर्वी राष्ट्रीय वृत्तवाहिनीत कामाला होते. ती नोकरी सोडून सारंगसोबत त्यांनी हॉटेल व्यवसायाला सुरूवात केली होती.

अॅण्टॉप हिल हत्येप्रकरणी आरोपीला अटक
SHARES
सायन कोळीवाड्यातील फ्लॅटमध्ये ५२ वर्षीय पत्रकाराचा मृतदेह सापडल्यामुळं मंगळवारी एकच खळबळ उडाली. या हत्येप्रकरणी पोलिसांनी सारंग हरीश पाथरकर या आरोपीला पुण्यातून अटक केली आहे.   

राष्ट्रीय वृत्तवाहिनीत कामाला

मृत आनंद नारायण माजी पत्रकार आहेत. सध्या ते पत्नी माला, मुलगी हितेश्‍वरी व वडील जी.एस. कृष्णन यांच्यासोबत गॅलॅक्‍सी अपार्टमेंटमधील सातव्या मजल्यावर वास्तव्याला होते. आनंद पूर्वी राष्ट्रीय वृत्तवाहिनीत कामाला होते. ती नोकरी सोडून त्यांनी सारंगसोबत हॉटेल व्यवसायाला सुरूवात केली होती. आनंद यांचा मित्र सेल्वम देवेंद्र यानं सर्वप्रथम आनंद यांच्या हत्येबाबतची माहिती पोलिसांना दिली. तोही या प्रकरणातील संशयीत आहे. त्यानंतर पोलिसांनी फ्लॅटवर जाऊन आनंदला तात्काळ शीव रुग्णालयात नेलं. परंतु रुग्णालयातील डॉक्‍टरांनी त्याला मृत घोषित केलं.

सीसीटीव्हीची तपासणी

या प्रकरणी पोलिसांनी इमारतीच्या सीसीटीव्हीची तपासणी केली असता, त्यात रात्री १ वाजेच्या सुमारास आनंद, पाटणकर व देवेंद लिफ्ट पकडून आनंदच्या फ्लॅटवर जाताना दिसत होते. त्यानंतर, तासाभरानंतर पाटणकर व देवेंद्र घाईत तिथून बाहेर पडताना दिसले. याशिवाय इमारतीबाहेरील सीसीटीव्हीत पाटणकर स्कूटरमधून काहीतरी नेताना दिसला. तो चाकू असल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत.

व्यावसायिक वादातून दोघंही वेगळे झाल्याची माहिती देवेंद्र यांनं पोलिसांना दिली. तसंच, ही हत्या झाली. त्यावेळी तो बाजूच्या खोलीत झोपला होता. त्यानंतर पाटणकरनं त्याला उठवून घडलेल्या प्रसंगाबाबतची माहिती दिल्याचं सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी पाटणकरला पुण्यातून अटक केल्याची माहिती धारावी पोलिसांनी दिली.  



हेही वाचा -

खडवली स्थानकाजवळ रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

८ जूनला मान्सून केरळात दाखल होणार, तर १३ जूननंतर मुंबईत पावसाची शक्यता



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा